झिनीया हे विविधरंगी हंगामी फुलपीक आहे. झिनीया फुलझाडांची लागवड प्रामुख्याने बंगला, बगिचांमध्ये फुलांचे ताटवे, फुलांचे वाफे तसेच हिरवळीच्या मध्यभागी अथवा बागेभोवती करतात. व्यापारी तत्वावर या फुलपिकांची लागवड फारच थोड्या प्रमाणात केली जाते. झिनीयाचे फूल अत्यंत आकर्षक, विविध रंगांचे आणि टपोरे असते. थोडीशी निगा व पाणी उपलब्ध असले तर या फुलझाडांची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. सहज करता येणारे, फारसा खर्च आणि लक्ष द्यावे न लागणारे हे पीक खरीप हंगामात घेतल्यास फायदेशीर ठरते. कारण श्रावण महिन्यात देवपुजेसाठी या फुलांना भरपूर मागणी असते. मोठ्या शहरात या फुलांना भरपूर मागणी असल्याने या पिकाच्या लागवडीस बराच वाव आहे.
झिनीया फुलझाडांची लागवड फार वर्षापासून भारतामध्ये सूरू झालेली आहे. मेक्सिको हे या फुलझाडाचे उगमस्थान असून तेथून अमेरीका आणि इतर देशात या फुलझाडाचा प्रसार झालेला आहे.
हवामान आणि जमीन :–
झिनीयाचे पीक उष्ण आणि कोरड्या तसेच दमट हवामानात वाढते. मात्र कडक थंडी झिनीयाच्या पिकाला मानवत नाही. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. मध्यम काळी ते भारी काळ्या जमिनीत देखील झिनीयाची वाढ चांगली होते. हलक्या मुरमाड जमिनीत शेणखताचा भरपूर पुरवठा केल्यास झिनीयाचे उत्पादन चांगले मिळते.
उन्नत जाती :–
१) झिनीया लिनिऑरीस (बटन झिनीया)
२) झिनीया इलेगन्स (गेंदा झिनीया)
३) झिनीया हँजेना (बुटका झिनीया)
हंगाम आणि लागवडीचे अंतर :–
– झिनीयाची लागवड जुलै – ऑगस्ट महिन्यांत करतात. दोन झाडांमधील व दोन ओळीमधील अंतर ४५ बाय ४५ सेंटीमीटर ठेवून लागवड करावी. एका जागी एकच रोप लावावे. गादीवाफ्यावरील रोपांची वाढ १५ सेंटीमिटर किंवा जास्त झाली असली तर लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडून रोपे लावावीत.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!