शून्य सावलीचा दिवस
( Zero Shadow Day)
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
7 मे – कोल्हापूर, मिरज, सांगली.
10 मे – सातारा, अक्कलकोट.
11 मे – वाई, महाबळेश्वर.
12 मे – बार्शी, बारामती.
13 मे – लातूर.
14 मे – अलिबाग, दौंड, पुणे.
15 मे – मुंबई.
16 मे – नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
18 मे – पैठण.
19 मे – जालना.
20 मे – औरंगाबाद, नाशिक.
21 मे – मनमाड.
22 मे – यवतमाळ.
23 मे – बुलडाणा, मालेगाव.
24 मे – अकोला.
25 मे – अमरावती.
26 मे – भुसावळ, जळगाव, नागपूर.
*आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !*
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.