अष्टपैलू स्वाद आणि औषधी गुण या दोहोंमुळे कांदा ५००० वर्षांपासून मानवी आहाराचा घटक आहे. या कंदभाजीत काही घटक असे आहेत, जे नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून काम करतात. मध्ययुगीन कालखंडात कांदा हा आहाराचा मुख्य घटक होता. त्या काळात कांदा घरभाडे म्हणून दिला जात असे. आरोग्यविषयक बरेच उपचार कांद्याच्या औषधी गुणधर्मामुळे केले जात असत. २१व्या शतकात जवळपास सर्वच खाद्यपदार्थांमध्ये कांदा वापरला जातो.
- कांद्याचे आरोग्यविषयक फायदे-
सूक्ष्मजीवप्रतिबंधक गुणधर्मांमुळे कांदा हा गेल्या कित्येक शतकांपासून नैसर्गिक प्रतिजैविक आणि बुरशीनाशक म्हणून वापरला जातो. यामध्ये आक्षेपनाशक व रोगप्रतिकारशक्ती उत्तेजक गुणधर्मही आढळतात. हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे.
- कांद्याचे आर्थिक महत्त्व-
प्रत्येक स्वयंपाकघरात कांदा एक मसाला आणि भाजी म्हणून महत्त्वपूर्ण तसेच अनिवार्य पदार्थ आहे.
कांद्याचे कंद भाजता, तळता, उकळता आणि मसाल्याने भरताही येऊ शकतात.
सूप, सॉस इत्यादी पदार्थांमध्ये तसेच अन्न रुचकर लागावे म्हणूनही कांदा वापरला जातो.
भुकटीसारख्या कोरड्या पदार्थांमध्येही कांद्याचा वापर होतो.
छोटे कंद विनेगर व नमकीन सारख्या पदार्थांमध्ये लोणचे घालण्यासाठी कामात येतात.
कांद्याची पात कोशिंबीरमध्ये वापरली जाते.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!