नेहा : आज टीचर म्हणाल्या उद्या आषाढी एकादशी आहे आहे तर उद्या आपल्या बालक मंदिराची दिंडी निघणार आहे. तर मुलीनी पातड नेसून ,तुळस घेवून तर मुलांनी धोती-कुर्ता घालून ,टाळ घेवून यायचे आहे. आजी आजी आषाढी एकादशी म्हणजे काय?
आजी :मी तुला आज एक गोष्ट सागते.
पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो, पत्नी व आई – वडिल यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता. तो दिवस रात्र आई-वडिलांची सेवा करीत असे. पुंडलिकाची मातृ- पितृ भक्ती पाहून भगवान श्री विष्णु स्वतः पुंडलिकला भेटायला आले. तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. भगवान श्री विष्णुनी पुंडलिकला आवाज दिला “पुंडलिक मी तुला भेटण्यास आलो आहे“ .पुंडलिक मात्र आई-वडिलांची सेवा करण्यात मग्न होता. भगवान श्री विष्णुनी पुन्हा पुंडलिकला आवाज दिला “पुंडलिक मी तुला भेटण्यास आलो आहे“. पुंडलिकाने श्री विष्णुन कडे एक वीट फेकली व आई-वडिल झोपे तोवर त्यावर उभे राहण्यास सांगितले. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलां विषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णु विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने मागे वळून पहिले तर साक्षात भगवान श्री विष्णु विटेवर उभे होते . नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंतीकेली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि तेव्हापासून भगवान श्री विष्णु हे विठ्ठल या अवतारात पंढरपूरात विटेवर उभे आहे .
आषाढ महिन्यातील एकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशीउपवास केला जातो. भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात. म्हणून या दिवशी भक्त आपल्या विठ्ठलाल भेटण्यासाठी पंढरपूरला जाता आणि आषाढी एकादशीचा उपवास करतात .
आजीची गोष्ट संपली आणि नेहाला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.