दुधामध्ये प्रथिने (proteins) असतात. प्रथिने केसीनपासून बनतात.ह्या केसीनमधे अमिनो आम्ले (amino acids) असतात. दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1दूध आणि A2 दूध.भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅन्सर इ.विविध आजार दूर करण्याची त्यामध्ये क्षमता आहे.
A1 दूध –
- विदेशी वंशाच्या काऊ संबोधल्या जाणार्या जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश यांचे तसेच यांपासून तयार केलेल्या संकरीत गायी यांचे दूध हे A1 प्रकारचे असते.
- या प्राण्यांच्या पाठीला वशिंड(Hump) नसते. असो, हे दूध देणारे वेगळे प्राणी आहेत.
A2 दूध – भारतीय वंशाच्या देशी गायींचे दूध हे A2 प्रकारचे असते. या मूळ भारतातील गायी असून त्यांच्या पाठीला वशिंड Hump असते. या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दूध असे म्हणतात. यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.
A1 दुधाचे घातक परिणाम– या प्रकारच्या दुधातीलप्रथिन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते.म्हणून या दुधास A1 दुध असे म्हणतात. या दुधातील याप्रथिननामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असते. जेव्हा हे दूध प्यायले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त ( split) होते व त्यापासून बी सी एम 7 (BCM 7 – Beta Caso Morphine 7) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक केमिकल बाहेर पडते. हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर(pancreas) हल्ला करुन तेथील इनसुलीनची ( Insulin ) निर्मिती पूर्ण बंद पाडते.या दुधामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetis ) हा रोग होतो. पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही, कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य संयुक्तपणे चालते. या दुधामुळे ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) स्किझोफ्रेनिया, कॅन्सर, किडनीचे रोग, स्रियांमधील एंडोमेट्रियॉसिस – यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येऊन स्त्रियांमधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे, पुरुषांमधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात. असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे. यासंदर्भात न्युझीलंड येथील शास्त्रज्ञ कीथ वुडफोर्ड यांचा डेव्हील इन द मिल्क (Devil In The Milk दुधातील सैतान) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. वेबसाइटवर पहा www.chelseagreen.com.
भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. विचार करा आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते. जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तूप गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय.
दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, ब्राझील या देशांमधे जर्सी,होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दूध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे. इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.
देशी गाय व जर्सी हे एकमेकांपासुन पूर्ण वेगळे आहेत. दोन्ही समोर ठेऊन निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध प्यायल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून जर्सीचे A1 दुध पितो, कसा रोग बरा होणार ??
आहे की नाही गोंधळ ??
परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे. ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत. तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त काही हजारांवर आली आहे. ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहिती आहे.)असे असुनही आपले डोळे अजूनही उघडलेले नाहीत.
भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवून विषारी बनवत आहोत. हे असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ज्ञांनी भारताला दिला आहे.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.