महाराष्ट्र राज्य ऊस पिकाबाबत प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रातमध्ये आडसाली पूर्वहंगामी आणि सुरु अशा तीन हंगामात उसाची लागवड केली जाते. आज देशात केवळ तणांमुळे सरासरी ३० ते ४० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात पिक उत्पादनात घट येते. एकूण कृषी उत्पादनाच्या होणाऱ्या किंमतीच्या कमीतकमी १०% टक्के घट निव्वळ तणांचे नियंत्रण वेळीच न केल्यामुळे होते. तणांमुळे होणारे उस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे. परंतु मुजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यांमुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. उसामध्ये सर्वसाधारपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना, ही अरुंद पानाची (एकदल) गवतवर्गीय तणे आणि घोळ, माठ, गाजरगवत, चादवेल, दुधानी उंदीरकांनी, गोखरू ही रुंद पानाची (द्रीदल) गवतवर्गीय तणे आढळतात.
अ) प्रतिबंधात्मक उपाय–
यामुळे पूर्वीचे पिक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी-आडवी खोल नांगरट, ढेकळे, फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात.
१) जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
२) तणे धसकटे वेचून जाळून नष्ट करावेत.
३) खतांच्या योग्य त्या मात्रा योग्यवेळी देवन उसाची जोमदार वाढ करावी.
४) गाजर गवतासारखी तणे बी येण्यापुर्वीच उपटून टाकावीत.
ब) जैविक पद्धतीने तण नियंत्रण –
या पद्धतीत तणांवर जगणाऱ्या किडी आणि रोगजंतू याद्रारे तण नियंत्रण करता येते.
क)निवारणात्मक उपाय –
उसामध्ये सुरुवातीच्या काळात अंतरपीक घेतल्यास स्पर्धात्मक पद्धतीने तणांच्या योग्य बंदोबस्तासह हिरवळीच्या खताचा फायदा होतो. उसातील दोन ओळीत मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो.
ड) जैविक पद्धतीने तण नियंत्रण –
या पद्धतीत तणांवर जगणाऱ्या किडी आणि रोगजंतू यांद्वारे तण नियंत्रण करता येते. उदा. गाजर गवत या तणांचे निर्मुलन “झायागोग्रमा बायकलरटा” (मेक्सिकन भुंगा) या जैवीक किटकाद्वारे करता येते.
इ) रासायनिक तण नियंत्रण –
भारतात भौतिक/यांत्रिक पद्धतीने तण नियंत्रणमोठ्या प्रमाणात केले जाते.
तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी –
१) शिफारशीनुसार योग्य प्रमाणात व वेळेवर तणनाशकांचा वापर करावा.
२) यासाठी डब्ल्यू.एफ.एन.- ४० (व्ही आकाराचा) नोझल वापरावा. नोझलवरप्लास्टिक हुडचा वापर करावा.
३) तणनाशकांची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.
४) तणनाशक फावारल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी जमिनीची कोणतीही मशागत करू नये.
५) २.४ डी तणनाश्कासाठी स्वतंत्र पंप वापरावा अथवा चांगली स्वच्छता करावी. पिकामध्ये २.४ डी साठी वापरलेला पंप वापरू नये.