कृषी विषयक सल्ला देणे हे आव्हानात्मक काम आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा स्तरावर हवामान अंदाज देण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आयएमडीचे उपमहासंचालक एस. डी अत्री म्हणाले, तालुकास्तरीय अंदाज देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर कुशल मनुष्यबळाची भरती करण्यात येत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर २०० तालुक्यांमध्ये अंदाज दिले जात आहेत. मात्र २०२० पर्यंत देशातील सर्वच जिल्ह्यामधील ६५०० तालुक्यांसाठी अंदाज देण्याचे उद्दिष्ट आहे. ५३० जिल्ह्यांत ग्रामीण कृषी हवामान सेवा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सध्या चार कोटी शेतकऱ्यांना किसान पार्टल आणि एसएमएसच्या माध्यमातून जिल्हास्तरीय हवामानाचा अंदाज दिला जात असून, २०२० पर्यंत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना तालुकास्तरीय अंदाज दण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांपर्यंत पाचण्यासाठी खासगी क्षेत्रातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक ए. के. सिंग म्हणाले, कृषी विस्तारसाठी सरकारी, खासगी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. परिषदेमार्फत देशातील ७१३ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचविण्यात येत आहे. तर दुसरीकडे खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थादेखील यासाठी काम करत आहे. या संस्थांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या धोरणाचा अवलंब करून, एकत्रीत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.