टरबूज आणि खरबूज (डांगर) उन्हाळी फळे भाग – 4

0

टरबूज व खरबूजच्या सुकवलेल्या बिया आयुर्वेदिक गुणकारी पोष्टिक असतात.

उन्हाळ्यात फळांचे प्रमाण / उत्पादन कमी असते. उन्हाळ्यात येणाऱ्या फळांमध्ये समावेश होतो. तो म्हणजे टरबूज आणि खरबूजचा टरबूजचे सरबत उन्हाळ्यात थंडगार आणि गोड असते. तर खरबूजला एक प्रकारचा सुगंध असतो. महाराष्ट्रात टरबूज आणि खरबूज उत्पादन नदीच्या पात्रात तसेच बागायती जमिनीत घेतले जाते. टरबूज व खरबूजची लागवड बिया टोचून करतात.

जमीन व हवामान-

मध्यमकाळी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन टरबूज आणि खरबूज योग्य असते.टरबूज आणि खरबूज उष्ण व कोरडे हवामान पोषक असते. तसेच भरपूर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

लागवड व हंगाम – टरबूज आणि खरबूज लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

बियाण्याचे प्रमाण-

कलिंगड- २.५ ते ३ किलो / हेक्टर

खरबूज – १.५ ते २ किलो / हेक्टर

लागवड करण्यापूर्वी बियाणास प्रती किलो ३ ग्रॅम थायरम चोळावे.

पूर्व मशागत- जमीन नागरणी करून भुसभुशीत करावी. चांगले कुजलेले १५ ते २० गाड्या शेण खात टाकावे. भारी / बागायती जमिनीस पेरणी दिल्यास जमिनीचा वरचा थर लाडक होतो. त्यामुळे बहरी / काळी बागायती जमिनीस पेरणी आधी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोचावे.

टरबूज – अर्का ज्योती, अर्का माणिक शुगर बेबी, न्यू हम्प, शुगर दुर्गापूर केसर, अर्का माणीक, पुसा बेदाणा या जाती लागवडीस योग्य आहेत. शुगर बेबी ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.

खरबूज – पुसा शरबती, हरा मधु, अर्का राजहंस, दुर्गापूर मधु, अर्का जीत, लखनऊ सफेदा, खारी धारी.

काढणी व उत्पादन – बी पेरल्या पासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी होते. काढणी ३ ते ४ आठवडे चालते. बागायती पेक्षा नदी पत्रातील फळे लवकर तयार होतात. फळ तयार झाले का ते या प्रकारे ओळखावे.

१ टरबूजाचे देठ सुकले कि ते तयार झाले असे समजावे.

२ तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. कच्च्या फळांचा धातूच्या वस्तू ठोकल्या प्रमाणे आवाज येतो.

३ फळ जमिनीला स्पर्श करतो. तो पांढुरका भाग पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे.

४ तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर्र असा आवाज येतो.

फळाची काढणी करताना २ – ३ फळे काढावीत बाकीची वाढू द्यावीत.

या वर्षी महारष्ट्रात पावसाचा दुर्भिक्ष्य शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलाय. अशा वेळी कमी पाणी असताना मल्चिंग पेपरच्या मदतीने करण्यात येणारी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचन यांचा संगम शेतकऱ्यांना नक्की फायदा देऊ शकतो.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.