कोल्हापूर : एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी भारतात मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून कमी पडण्याबाबत अंदाज वर्तवला जात आहे. विविध संस्थानी नकारात्मक अहवाल दिल्याने त्याचा थेट परिणाम कृषि अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारपेठेतही पहायला मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एल निनोबाबत अंदाज वर्तविताना खबरदारी घेण्याचा इशारा जागतिक हवामान संस्थेने दिलाय. आता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही यावर्षी भारतात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे जागतिक हवामान संस्थेने याची दखल घेत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.