वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागा उध्वस्त

0

जळगाव तालुक्यातील गिरणा व तापीकाठच्या काही गावांना रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. याशिवाय जवळपास दहा मिनिटे गारपीटही झाली. यामुळे या भागातील केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या अनेक बागा आडव्या झाल्या आहेत.

जळगाव तालुक्यातील गिरणा व तापीकाठच्या काही गावांना रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले.  याशिवाय जवळपास १० मिनिटे गारपीटही झाली. यामुळे तालुक्यातील कठोरा, भादली, किनोद आणि सावखेडा या गावांच्या परिसरात असलेलेल्या केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास किनोद, सावखेडा व कठोरा भागात वादळी पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळींच्या बागांचे नुकसान झाले आहे. भोकर ते आमोदा पर्यंतच्या तापी काठच्या गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. किनोद परिसरात पावसासह गारपीट झाल्यामुळे चाऱ्याचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांची या वाढली पावसामुळे चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर अनेक वृक्षांच्या फांद्या तुटल्या आहेत.

जळगाव शहरात देखील दुपारी चार वाजेच्या सुमारास वाढली वारे वाहत होते. यातच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जळगावकरांना ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला.

गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उकाड्यामुळे हैराण असलेल्या जळगावकरांसाठी रविवारची सायंकाळ काही अंशी दिलासादायक ठरली. रविवारी दुपारी ३ वाजेनंतर आकाशात ढगांनी गर्दी केलेली दिसून आली. त्यामुळे ३ वाजेनंतर तापमानात देखील घट झाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे बाजारपेठेतील विक्र्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात मात्र पावसाने हजेरी लावलेली नसल्याने जळगावकरांची निराशा झाली. काही भागात किरकोळ पावसाने हजेरी लावलेली दिसून आली.

खरिपाच्या तयारीला येणार वेग : तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजरी लावल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तय्रीला वेग येणार आहे.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.