भाजीपाल्यातील जीवनसत्त्वे

0

भाजीपाल्यात जीवनसत्वांचे प्रमाण कमी असते, परंतु अन्न म्हणून शरीरात शोषला गेलेला भाजीपाला शरीरातील प्रत्येक अवयवाला क्रियाशील ठेवण्यासाठी उपयुक्त असतो. नेहमी ताजा, हिरवागार भाजीपाला खाल्ला पहिजे. कारण यातील जीवनसत्वे पूर्णतः मिळतील. शिळा वा नासका भाजीपाला खाल्ल्यास जीवनसत्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळणार नाहीत. एकदा शिजवलेली भाजी पुनःपुन्हा गरम करु नये, तसेच भाजी नेहमी मंद आचेवर शिजवावी. भाजी कडून वा वाफेवर शिजवून खाल्ली तरी त्यातील जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळतात.
कोणत्या भाजीत कोणते जीवनसत्व किती प्रमाणात आहे हे पुढे संक्षिप्‍त रुपात दिले आहे.

’अ’ जीवनसत्त्व ः –
ज्या व्यक्तीच्या आहारात ’अ’ जीवनसत्त्वाचा अभाव असतो त्याला रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. मूतखड्याचा विकार होऊ शकतो. चेहर्‍यावर पुटकुळ्या येतात. चेहरा मलूल व कोरडा पडतो, तसेच त्वचाही कोरडी पडते आणि नजर कमी होते. वाचन करताना डोळ्यांना थकवा जाणवतो.
भोजनातून योग्य प्रमाणात ’अ’ जीवनसत्व शरीराला मिळाल्यास चरबीचा विलय होतो, शरीर सुदृढ राहून मुलांची उंची वाढते, तसेच जननसंस्थेचे कार्य ठीक चालते. दृष्टीरोग होत नाहीत. श्‍वाससंस्था चांगले कार्य करते. आतडी मजबूत होतात. अधिक प्रमाणात ’अ’ जीवनसत्व शरीरात गेल्यास ते यकृतात साठले जाते व गरजेच्या वेळी शरीर ते वापरते.
मानवाला दररोज आवश्यक असणारे ’अ’ जीवनसत्व दररोज 125 ग्रॅम भाजीपाला खाऊन मिळवता येते. हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, गाजार, मेथी, हिरव्या मिरच्या, पालक, कांद्याची पात, कोबी, मटार, बीट, टोमॅटो, नवलकोल, रताळे यात ’अ’ जीवनसत्व योग्य प्रमाणात असते. रोजच्या जेवणात यांचा वापर करावा.

’ब’ जीवनसत्त्व ः-
’ब’ जीवनसत्त्वसुद्धा भाजीपाला खाण्यातून शरीराला मिळते. हे जीवनसत्त्व योग्य प्रमाणात शरीराला न मिळाल्यास भूक मंदावते, वजन घटू लागते. शरीराचे तापमान ठीक राहत नाही. बेरी-बेरी नावाचा विकार ’ब’ जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो. जनशक्ती कमी होते शरीराचा विकास योग्य होत नाही.
शेंगभाज्या, मटार व पालेभाज्यांतून ’ब’ जीवनसत्त्व मिळते. कोबी, कोथिंबीर, गाजर, कांदा, हिरव्या मिरच्या यांत हे जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. भाजी जेवढी ताजी तेवढे ’ब’ जीवनसत्त्व अधिक समजावे.

’क’ जीवनसत्त्व ः –
’अ’ जीवनसत्व चरबीयुक्त पदार्थात एकजीव होणारे असते, तर ’क’ जीवनसत्त्व पाण्यात मिसळणारे असते. ’क’ जीवनसत्वाचा अभाव झाला तर दातदुखी होते. दात किडतात-तुटतात, हिरड्यांना सूज येते. स्कर्व्ही नावाचा विकार उदभवतो. शरीरात गाठी निर्माण होतात. ’क’ जीवनसत्त्वाला ’एस्कोर्बिक आम्ल’ असेही म्हणतात. मोठ्या आचेवर पसरट भांड्यात जर भाजीपाला शिजवला तर त्यातून हे जीवनसत्त्व वाफेबरोबर उडून जातं. हे जीवनसत्त्व कच्चा भाज्यात आणि उकडलेल्या भाज्यात टिकून राहातं, आयरिश बटाट्यात व हिरव्या मिरचीच ते सातपट असतं.
स्कर्व्ही विकार असणार्‍याने बटाटे, रताळे व नवलोकल खावीत. यामध्ये ’क’ जीवनसत्त्व अधिवक प्रमाणात असते. तसेच कोथिंबी, पालक, हिरवी मिरची, मेथी, टोमॅटो यांचेही सेवन करावे.

’ड’ जीवनसत्त्व ः-
दात व हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला ’ड’ जीवनसत्त्वाची गरज असत. ’ड’ जीवनसत्व चरबीयुक्त पदार्थात मिसळणार आहे. याच्या अभावाने रिकेट नावाचा विकार होतो. रिकेट म्हणजेच मुडदूस रोग होय.
’ड’ जीवनसत्त्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस व खनिजांना कॅल्शिकरण करायला साह्यभूत होत असते. ही क्रिया हाडांना मजबूती आणत असते. यासाठी भरपूर पालेभाज्य खाल्लया पाहिजेत. तसेच मुडदूस विकार असणार्‍यांनी रोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या सूर्यकिक्षरणांत बसले पाहिजे. त्वचाविकार असणार्‍यांनीही कोवळी सूर्यकिरण सकाळी अंगावर घ्यावीत.

’ई’ जीवनसत्त्व ः-
’ई’ जीवनसत्त्वसुद्धा चरबीयुक्त पदार्थात मिसळणार आहे. जननसंस्थेच्या प्रक्रियेसाठी या जीवनसत्वाची शरीराला गरज असते. वांझपणा टाळण्यासाठी हे जीवनसत्त्व उपयुक्त असते. कोबी, हिरव्या भाज्या, कोथिंबीर तसेच वनस्पती तेलातून हे शरीराला मिळते.

’जी जीवनसत्त्व’ ः-
तोंडाला चव नसणे, भूक मंदावणे ही लक्षणे ’जी’ जीवनसत्त्वाच्या अभावाने निर्माण होतात. तसेच वजन घटणे, तोंड दुखणे आणि केस गळती होऊन टक्कल पडू लागणे ही लक्षणेसुद्धा या जीवनसत्त्वाच्या अभावात दिसून येतात.
’जी’ जीवनसत्त्वाच्या अभावाने शरीराची वाढ खुंटते, त्वचा कोरडी पडून ती खडबडीत होते, माणून वृद्ध दिसू लागतो. हे जीवनसत्त्व पाण्यात मिसळणारे असून ’क’ जीवनसत्त्वाशी साम्य दर्शवते. याकरिता हिरव्या पालेभाज्यांचे सूप व फळभाज्या खाव्यात.

भाज्यातील कार्बोहायड्रेटूस ः-
रोजच्या जेवणात खनिज तत्तव तसेच विभिन्न जीवनसत्व असणे शरीरासाठी आवश्यक असते. तसेच कार्बोहायड्रेट्स असणेसुद्धा गरजेचे असते. नाहीतर शरीराचा सर्वांगीण विकास होणार नाही.
रताळी, बटाटे, हिरव्या शेंगभाज्या, कडधान्ये, कंदभाज्या व मूळभाज्या यांना कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असल्याने भोजनात यांचा वापर केला पाहिजे.

प्रथिने ः-
प्रत्येकाला आपले शरीर धष्टपुष्ट व आरोग्य संपन्न असावे असे वाटत असते. याकरिता आपण दररोज चौफेर आहार घेतला पाहिजे. अशज्ञा आहारामुळे पेशींना क्षार मिळतात. पेशी क्षारयुक्त असतात. तसेच मानव हा शाकाहारी प्राणी आहे हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऋषिमुनी फलाहार घेत असत व वनस्पतींचे सेवन करीत. अंडी, मांस हे शरीराचे क्षारीय संतुलन बिघडवतात. शिवाय आपण जसे अन्न खातो तसा आपण स्वभाव बनतो. मांसाहार करणारे क्रूर तर शाकाहारी बुद्धिजीवी मानले जातात. शरीरातील क्षारीय संतुलन बिघडू नये म्हणून भाजीपाला खल्ला पाहिजे. थंडी व मांस हे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. यांचे अतिसेवन क्षारीय संतुलन बिघडवणारे असते.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.