विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहेत.
ग्रेड १९:१९:१९
या
खतांस स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात नत्र, स्फुरद व पालाश आहे.
यातील नायट्रोजन हा अमोनिकल, अमाईड
आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध आहे. या खतांच्या आम्ल गुणांमुळेठिबकसंचाचीछिद्रेबंदहोतनाहीत. अन्नधान्य, भाज्या, फळपिकांसाठी उपयुक्त.
ग्रेड १२:६१:०
१२ टक्के नत्र व ६१ टक्के फॉस्फरस असलेले १०० टक्के पाण्यात विद्राव्य खत. कॅल्शियमयुक्त खते वगळतासर्वविद्राव्यखतांबरोबरमिसळूनवापरतायेते. नवीन मुळांच्याजोमदारवाढीसाठीयोग्य. फुलांच्यापुर्णवाढीसाठीवतुरेयेतानाउपयुक्त.
ग्रेड ०:५२:३४
खतांमध्ये ५० टक्के स्फुरद व ३४ टक्के पालाश असते. फुले लागण्याच्या व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी, आकर्षक रंगासाठी उपयुक्त. कॅल्शियम युक्त खतांसोबत मिश्रण करू नये. पिकांवर फवारले असता पीक करपण्याचा धोका कमी असतो.
ग्रेड १३:०:४५
या मध्ये १३ टक्के नत्र व ४५ टक्के पालाश आहे. फळधारणावत्याचीवाढहोतअसतानाफवारावे. फळाचाआकारवत्यातीलसाखरेचेप्रमाणवाढते. जडधातूवक्लोराईडस्विरहितआहे. फळेअकालीगळणेथांबवते. खतांमुळेपिकेअवर्षणस्थितीततगधरूशकतात.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
ग्रेड सीए – १९ टक्के एन-१५.५ टक्के
मुळांचीआणिहिरवी वाढ होण्यास मदत करते. पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती वाढवते. यात १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात कॅल्शियम आणि नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजनही त्वरित मिळतो. आम्लवअल्कलीगुणधर्माच्याजमिनीतवापरतायेते. फळेसडणे, फळांना तडे पडणे कमी होते. केवळठिबकसिंचनामध्येवापरकरावयाचाअसेलतरफॉस्फेटवसल्फेटअसलेल्याखतांबरोबरमिश्रणकरूनये.
ग्रेड ०:०:५०-१८एस
पोटॅश ५० टक्के आणि
गंधक १८ टक्के गंधकामुळेउत्पादनाचादर्जावाढतो, स्वाद येतो. कीड, रोगांच्या प्रादुर्भावास
प्रतिकारक्षमता वाढते. पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. फळांतीलसाखरेचेप्रमाण, आकार, दर्जामध्ये सुधारणा होते. फळलवकरपिकते, क्लोरीन
विरहित खत.
फवारणीद्वारे वापर
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर करताना पिकांवर नियमित व वारंवार फवारणी केली पाहिजे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा
फवारणीद्वारे वापर फळवर्गीय पिकांना फारच उपयुक्त आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात खतांचा चुना योग्य त्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. उदा. जस्त अन्नद्रव्यांच्या फवारणीसाठी ०.५ टक्के जस्त सल्फेटच्या द्रावणात ०.२५ टक्के चुना मिसळतात. ज्यामुळे द्रावणाचा सामू अल्क किंवा आम्लधर्मी होत नाही.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
सूक्ष्म अन्नद्रव्ये, खतांचे फवारणीद्वारे द्यावयाचे प्रमाण
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आटोक्यात आणण्यासाठी १५ ते २१ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा किंवा शिफारशीनुसार पिकांवर फवारणी करावी.
फवारणीकरिता द्रावणात स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर द्रावणात मिसळावा. म्हणजे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता व उपयुक्तता वाढते.
ज्या पिकांच्या पानावर मेणयुक्त थर असतो त्या पिकांवर
फवारणी करताना द्रावणात स्टीकर मिसळावा.
फवारणी करतांना
घ्यावयाची काळजी
द्रावणाची तीव्रता कमी ठेवून जास्त फवारण्या कराव्यात, परंतु जास्त तीव्रतेचे द्रावण
कधीही करू नये.फवारणीच्या वेळेस थेंबाचे आकारमान अत्यंत कमी असावे. म्हणजे थेंब
पानांवर किंवा झाडावर पडताच चिटकला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर
पडतो.
फवारणी केल्यानंतर
द्रावणाचा थेंब पानावर चिकटत नसेल तर स्टीकरचा वापर करावा.
फवारणीतून दिलेली खते
जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु फवारणीतील खते अचानक
निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.
पीक फुलोऱ्यात
येण्याचा काळ, फळधारणा
झाल्यानंतर तसेच बिया, फळांची
वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे
दिलेली खते खूप उपयोगी पडतात.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.