पिकांनुसार मल्चिंग पेपरचा उपयोग

0

अवकाळी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतकरी बांधवांना पाणी अभावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपरच्या साह्याने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या उपयोगामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात बचत होते. दर्जेदार उत्पादन मिळते, यामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळतो आणि याचा सर्वस्वी फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फुलझाड पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपर च्या साह्याने घेता येतात.

पिकांनुसार मल्चिंग पेपर कसा वापरावा?

पिके मल्चिंग पेपर अंथरण्याची पद्धत
भेंडी   ४ फुटांवर दोन ओळी बेड
वांगे   ५ फूट बेड
टोमॅटो   ८ फूट जोडओळ लागवड
ढोबळी मिरची   ५ फूट जोडओळ
मिरची   ५ फूट जोडओळ
भुईमूग   ४ फूट दोन ओळीतील अंतर
कलिंगड   ८ फूट अंतरावर अथवा जाडओळ अंतरावर दोन बेड मधले अंतर १५ फूट
काकडी   ५ ते ८ फूट बेड
खरबूज   ५ फूट सिंगल ओळ बेड, ८ फूट डबल ओळ बेड
दोडका   ५ ते ७ फूट मांडव

 

मल्चिंग पेपरचे फायदे

 • बाष्पीभवनामुळे वाफ होऊन जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
 • बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार पृष्ठभागावर येत नाहीत.
 • खतांच्या वापरात बचत होते. कारण खते पाण्यासोबत वाहून जात नाही.
 • जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस बंधन येते .
 • प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात व त्यांचे अस्तित्व संपुष्टात येते
 • जमिनीचे निर्जंतुकीकरण जमिनीच्या तापमान वाढीमुळे होण्यास मदत होते.
 • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते.
 • लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया मोठ्या प्रमाणात होते.
 • पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात व उगवण २-३ दिवस आधी होते.
 • भुईमुगासारख्या पिकात मुळांवरील वरील गाठींचे प्रमाण वाढते ज्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होतो
 • सूक्ष्मकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या पाण्याच्या वेगामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.