• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 21, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

Girish Khadke by Girish Khadke
September 26, 2019
in शेती
0
ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
Share on FacebookShare on WhatsApp

साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते, सेंद्रीय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचाच वापर केला जातो, अशा जमिनीतून सूक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण जादा झाल्यामुळे जमिनीत त्यांची कमतरता भासते. ऊस उत्पादन वाढीसाठी लक्षणे ओळखून शिफारशीत मात्रेमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.

ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य आणि लोह, जस्त, मॅगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही.

राज्यातील उसाखालील जमिनीत विशेषत: चुनखडीयुक्त जमिनीत जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते, अशा ठिकाणी उसावर केवडा पडलेला दिसून येतो.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उसावरील कमतरता लक्षणे लक्षात घेता नेमके कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे पीक निरीक्षणावरून ठाम ओळखणे अवघड जाते किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता लक्षणातील काही बाबी समान असल्यामुळे कमतरतेचा अंदाज करण्यात संभ्रम निर्माण होतो.

जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मर्यादा पातळीच्या खाली गेल्यास पानातील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते आणि पिकावर कमतरता लक्षणे दिसून येतात. याचा परिणाम ऊस पीक वाढीवर आणि पर्यायाने ऊस उत्पादनावर होतो.

सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे प्रतिकूल परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात. मात्र त्यांची कमतरता उत्पादनावर परिणाम करते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीत पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही.
वसंतदादा साखर संस्थेत झालेल्या मॄद सर्वेक्षण अहवालानुसार साधारण ७० टक्के जमिनीत जस्त आणि३० टक्के जमिनीत लोह या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली आहे.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची ऊस पिकातील कार्ये आणि कमतरतेची लक्षणे :-

१)लोह
कार्ये :-
१) हरितद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त.
२) पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत.
३) इतर अन्नद्रव्यांच्या शोषणात मदत करतो.
४) झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक.
कमतरता लक्षणे :-
१) नवीन पाने पिवळी दिसतात, शिरा हिरव्या दिसतात.
२) लक्षणे प्रथमत: वरील भागातील पानावर आढळून येतात.
३) पाने पांढूरकी होउन शेवटी वाळून जातात.

२)जस्त
कार्ये :-
१) प्रथिने व वितंचके (एन्झाईम) निर्मीतीस आवश्यक घटक.
२) पिकांच्या वाढ करणाऱ्या प्रेरकांच्या वाढीसाठी आवश्यक.
३) वनस्पतीमध्ये इंडोल ॲसिटीक ॲसिड (आ.ए.ए) तयार होण्यासाठी ट्रिव्होफेनच्या निर्मितीची आवश्यक असते. त्यासाठी जस्त आवश्यक.
४) संप्रेरक द्रव्ये (हार्मोन्स) तयार होण्यास मदत करतो. प्रजनन कियेमध्ये आवश्यक.
कमतरता लक्षणे :-
१) पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागतो, शिरा हिरव्याच राहतात.
२) करपलेले ठिपके व तांबडे डाग पानाच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.
३) उसामध्ये कांड्या आखुड पडतात.

३)मॅगेनीज
कार्ये :-
१)प्रकाश संश्लेषण प्रकियेत मदत.
२) जैविक दृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशिजालामध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध.
कमतरता लक्षणे :-
१) पानात हरितद्रव्याचा अभाव.
२) मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात,त्यामुळे पानावर चौकटीदार नक्षी दिसते.

४)तांबे :-
कार्ये :-
१) वनस्पतींना तांब्याची गरज फार अल्पप्रमाणात असते.
२) तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त उपलब्ध झाल्यास अपायकारक ठरते.
३) हरितद्रव्ये व प्रथिने तयार होण्यासाठी मदत.
४) लोहाचा उपयोग योग्यप्रकारे होण्यासाठी मदत.
५) श्वसनक्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक.
कमतरता लक्षणे :-
१) पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.
२) वनस्पतीचे खोड मऊ व लवचिक बनते.
३) फुटव्यांची संख्या कमी होते.
४) पानांवर हिरवे ठिपके दिसतात.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

५) बोरॉन :-
कार्ये :-
१) कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत.
२) नत्राचे शोषण करण्यास मदत.
३)पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत.
४) आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास मदत.
५) वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक.
कमतरता लक्षणे :-
१) पाने ठिसूळ बनून गुंडाळली जातात.
२)उसाचा शेंडा पिवळा पडतो, नंतर तो तांबूस काळा पडून वाळतो.
३) शेंडयाकडील कोवळ्या पानांवर पाण्याचे लहान लहान पारदर्शी ठिपके दिसतात.

६)मॉलिब्डेनम :-
कार्ये :-
१) आवश्यक तांबे किंवा जस्तापेक्षाही खूपच कमी प्रमाणात आहे.
२)अमिनो आम्ले व प्रथिने तयार होत असताना नत्राचे प्रथम अमोनिअममध्ये क्षपण घडवून आणणाऱ्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक.
कमतरता लक्षणे :-
१) पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.
२) पानांच्या वरच्या भागावर पिवळ्या रंगाच्या पट्या दिसून येतात.
३) काड्यांची लांबी व जाडी कमी होते.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरूप विद्राव्य खत :-

व्हीएसआय मायक्रोसोल मध्ये लोह (२.० टक्के),मॅंगेनीज (१.० टक्का), जस्त (५.० टक्के), तांबे (०.५ टक्के) आणि बोरॉन (१.० टक्के) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.याच्या वापरामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य निर्मित्ती, प्रथिने आणि संप्रेरके निर्मित्तीत वाढ होते.पेशींची वाढ होऊन पेशी विभाजनात सक्रिय सहभाग दिसून येतो.परिणामी ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात वाढ होते.
हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे आणि सेंद्रीय आम्लयुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे तसेच जमिनीतून देण्यास उपयुक्त आहे.

एकरी १० किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा द्यावी. हे खत सेंद्रीय आम्लयुक्त असून पाण्यात पुर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचन आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे.
ठिबक संचाद्वारे प्रत्येकवेळी एकरी २.५ किलो व्हीएसआय मायक्रोसोल प्रति १०० लिटर पाण्यात विरघळून लागवडीच्या वेळी, लागवडीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा द्यावे.

ठिबक संच नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागवडीच्या वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीच्या वेळी ५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.


फवारणीसाठी उपयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खत :-


सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतो.उसाच्या पानांवर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यामुळे खताची पिकाला उपयुक्तता वाढते.पानातील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य होते. परिणामी मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषणसुद्धा वाढते. ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
मल्टिमायक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानांवर दोन फवारण्या कराव्यात. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतात लोह(२.५ टक्के), मॅंगेनीज(१.० टक्के), जस्त(३.० टक्के), तांबे (१.० टक्के),मॉलिब्डेनम (०.१ टक्के) आणि बोरॉन (०.५ टक्के) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताच्या दोन फवारण्या केल्यास प्रति हेक्टरी ८ ते १० टन ऊस उत्पादनात वाढ झालेली दिसून आली आहे. यासाठी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति एकरी २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ९० दिवसांनी मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति एकरी ३ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून करावी.
कोणतीही इतर रसायने द्रवरूप खतात मिसळू नयेत.

क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीत आणि चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण कमी होते. अशावेळी मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची फवारणी फायदेशीर ठरते.

संपर्क :- ०२०- २६९०२२७८

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Use of microorganisms to increase sugarcane productionऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
Girish Khadke

Girish Khadke

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In