गव्हास रासायनिक खतांचा वापर

1
  • स्फुरद:

गव्हास स्फुरद खत केव्हा व कसे दयावे ?

१) जमिनीतील उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण – गव्हास नत्रयुक्त खताबरोबर पुरेशा प्रमाणात स्फुरद खताचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वच जमिनीमध्ये स्फुरदाचे प्रमाण कमी ते मध्यम प्रमाणात आहे. त्यामुळे जमिनीची उपलब्ध स्फुरद पुरविण्याची क्षमता आजमाविण्यासाठी मातीपरीक्षण करून घेणे फायदेशीर ठरते. असे न केल्यास गव्हास दिलेल्या नत्रयुक्त खताचा योग्य तो फायदा घेता येत नाही.

२) खते पेरून द्या – जमिनीत स्फुरद खते घातल्यानंतर त्यांचा संपर्क जमिनीतील चिकणमातीशी व इतर रासायनिक मूलद्रव्ये व संयुगे यांच्याबरोबर आल्यामुळे अल्प कालावधीतच विद्राव्य किंवा अविद्राव्य स्वरुपात होते. यालाच स्फुरदस्थिरीकरण असे म्हणतात. पिकास उपलब्ध स्फुरदाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यास अडचण येते. कारण या क्रियेमुळे गव्हास घातलेल्या खताचे रुपांतर पाण्यात न विरघळणाऱ्या संयुगामध्ये होते. हे खत जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून किंवा विस्कटून न देता मुळाच्या सान्निध्यात टाकावे. जेणेकरून या खताचा मातीच्या कणांशी अधिक संपर्क येईल व गव्हाच्या मुळांच्या सान्निध्यात हे खत जितके अधिक येईल, तितक्या अधिक प्रमाणात या खताचा चांगला परिणाम आढळून येतो. पेरणीच्या वेळी हे खत ओळीत पाभरीने पेरून दयावे.

३) पेरणीच्या वेळी संपूर्ण खत द्या – ही खते गव्हास पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात द्यावीत. कारण स्फुरदाच्या स्थिरीकरण क्रियेमुळे स्फुरदयुक्त खताचा ऱ्हास नत्रयुक्त खतासारखा होत नाही.

४) योग्य खताची निवड – गहू हे अल्पावधीत तयार होणारे पीक असल्याने यास ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ या खताचा उपयोग करावा. कारण यास पाण्यात विरघळणारी स्फुरद खते देणे फायदेशीर ठरते.

  • पालाश:

महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीत उपलब्ध पालाशाचे प्रमाण मध्यम ते जास्त प्रमाणात असल्यामुळे गहू-पिकाकडून पालाशयुक्त खतास सांख्यिकीयदृष्टया समर्थनीय असा प्रतिसाद मिळत नाही. पालाशयुक्त खतामुळे कीड व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होत असल्यामुळे त्याकरिता उपलब्ध पालाश पुरविण्याची जमिनीची क्षमता पाहूनच आवश्यकतेनुसार पालाश देण्यासाठी ‘म्युरेट ऑफ पोटॅश’ या खताचा वापर करावा. गहू पेरणीच्या वेळीच हे खत पेरून दयावे.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com/

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
1 Comment
  1. Anonymous says

    1

Leave A Reply

Your email address will not be published.