ठिबक सिंचनामध्ये फिल्टरचे उपयोग

2

ठिबकच्या नळ्या स्वच्छ करण्यासाठी फिल्टरची निवड केली जाते. व ही महत्वाची पद्धत असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो. मात्र इतर फिल्टर हे पाण्याच्या गुणवत्तेनुसार बसविणे आवश्यक असते.

1) जाळीचा फिल्टर (Screen Filter) – विहिरीचे व बोअरचे पाणी असेल आणि कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावे.

 

 

 

 

2) डिस्क फिल्टर (Disc Filter)- पाण्यात घनपदार्थ,सेंद्रिय पदार्थ आणि विरघळणारे क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्र असल्यास डिस्क फिल्टरची वापरावे. या फिल्टरमध्ये प्लास्टिकच्या चकत्या असतात. त्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यावर बारीक-बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये आलेले पाणी दोन चकत्यामधील खाचातून स्वच्छ होऊन बाहेर पडते.

 

 

 

3) वाळूचा फिल्टर- Sand Filter जर नदीचे,तलावाचे,नाल्याचे पाणी असेल आणि पाण्यामध्ये शेवाळे किंवा तरंगणारे पदार्थ येत असतील. आणि हे पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर बसविणे आवश्यक आहे. अन्यथा जाळीचा फिल्टर वांरवार चोकप होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही.

 

 

 

4) शंकु फिल्टर (Hydrocyclon Filter)- तसेच जर पाण्यात वाळूचे,मातीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक चोकप करू शकतात. नवीन खोदलेल्या विहिरीतून किंवा जुन्या बोअरवेल मधून पाण्याद्वारे असे कण येत असतील. तर यासाठी शंकु फिल्टर वापरावे. शंकु फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनस्वरूपाचे असल्याने पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन गुरुत्वाकर्षणामुळे तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. म्हणून आपण पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज असल्यास दोन वेगवेगळे फिल्टर बसवू शकतो.

ठिबक संचाची निगा कशी राखाल?

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. […] ठिबक सिंचनामध्ये फिल्टरचे उपयोग […]

Leave A Reply

Your email address will not be published.