विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

0

विदर्भातील ब्रम्हपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद तापमान पोहचले ४६.२ वर. गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.या उष्णतेच्या लाटेने ब्रह्मपुरी चांगलीच तापत आहे.बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात ब्रम्हपुरी येथे झालेली ४६.२ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद हि देशातील उच्चांकी तापमानाची नोंद असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

विदर्भातील ब्रम्हपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद तापमान पोहचले ४६.२ वर. गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.या उष्णतेच्या लाटेने ब्रह्मपुरी चांगलीच तापत आहे.बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात ब्रम्हपुरी येथे झालेली ४६.२ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद हि देशातील उच्चांकी तापमानाची नोंद असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर छत्तीसगड ते उत्तर कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या परिसरात असून ते समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या नैऋत्य भाग आणि लक्षद्वीपचा परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थितीसमुद्रसपाटीपासून दीड ते २.१ किलोमीटर या दरम्यान आहे. उत्तर भारतातील पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम
राज्यातील वातावरणावर होत आहे. आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात उद्यापासून अंशतः ढगाळ हवामान राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट कायम असून कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णता वाढली आहे. या उष्णतेमुळे उन्हाचा चटका वाढला असून विदर्भात पुन्हा पारा झपाट्याने वाढत आहे. आज आणि उद्या या भागात उष्णता वाढणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, वाशीम, अकोला, नागपूर येथेही तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी येथेही पुन्हा तापमान वाढले आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात तापमान सरासरीपर्यंत खाली आले आहे.

याशहरांचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे:-

सोलापूर,बीड,नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.

बुधवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३७.८ (०.१), जळगाव ४२.६ (-०.४), कोल्हापूर ३५.६ (-१.०), महाबळेश्‍वर ३१.५ (०.२), मालेगाव ४१.६ (१.३), नाशिक ३७.२ (-१.०), सांगली ३८.२, सातारा ३८.९ (१.९), सोलापूर ४३.० (२.२), सांताक्रूझ ३३.१ (-०.२), अलिबाग ३९.६ (७.०), रत्नागिरी ३२.७ (०.१), डहाणू ३३.९ (०.१), औरंगाबाद ४१.२ (१.६), बीड ४३.२ (२.९), नांदेड ४३.०(१.३), परभणी ४४.६ (२.७), उस्मानाबाद ४१.८ (२.४) अकोला ४४.४ (२.१), अमरावती ४४.० (१.५), ब्रम्हपुरी ४६.२ (४.१), चंद्रपूर ४५.० (२.२), गोंदिया ४३.० (१.०), नागपूर ४४.६ (२.४), वर्धा ४४.५ (१.७), वाशिम ४३.२, यवतमाळ ४३.५ (१.८).

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.