पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

0

आपल्याला माहीतच आहे कि, वाशिम जिल्ह्याम्हणजे दरवर्षी हळदीची विक्रमी लागवड केली जाणारा जिल्हा. त्यामुळे यावेळेससुद्धा बहुतांश शेतकऱ्यांनी हे पीक घेतले. हळद पिकाची काढणी आटोपली असून, ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालीआहे. हळद काढल्यानंतर शेतांमध्येच भट्टी पेटवून त्यावर ठेवल्या जाणाऱ्या मोठ्या कढईत हळद उकळली जाते. तुलनेने कठीण असलेल्या हळद काढण्याच्या या पारंपरिक प्रक्रियेसाठी अनुभवी मजूरांची मदत घेतली जात आहे. यंदा हळदीपासून विक्रमी उत्पन्न हाती पडण्याची शक्यता हळद उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.