महाराष्ट्र हे राज्य उष्ण कटिबंधात मोडते. त्यामुळे राज्यातील जी हवामान आहे. ती बहुतांशी समशीतोष्ण कोरडे आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वार्षिक पावसाचे प्रमाण ५०० ते ६०० मि.मी. पर्यंत आहे. तर वार्षिक सरासरी ७५० मि.मी. आहे.
मुख्यत :- नैऋत्य मान्सून ह्या वा-यापासून पाऊस ६० ते ७० दिवसात पडतो. महाराष्ट्रातील पूर्व भागात ईशान्य मान्सून वा-यापासून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. उन्हाळ्यात तापमान जास्तीत जास्त ४५ अंश से. पर्यंत वाढते. हिवाळ्यात ते ५ अंश सें. पर्यंत कमी येतो. महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर हवामान उष्ण व दमट वातावरण असतें तर मध्य महाराष्ट्रात ते कोरडे व पूर्व भागात उष्ण व दमट असते. हवेतील सकाळचे आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत असून, दुपारचे २० ते ६० टक्क्यांपर्यंत राहते. महाराष्ट्रासाठी पडणारा पाऊस, जमिनी, पीक पद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या सर्वांचा विचार करून ९ कृषी हवामान विभाग पाडले आहेत. महाराष्ट्रातील शेती ही ७५ ते ८४ टक्के पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण हे कमी कालावधीत जास्त पाऊस किंवा दोन पावसांत मोठा खंड पडत असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे राहिलेले नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता अतिशय कमी असून त्यात नेहमीच अस्थिरता आढळून येते.
आपत्कालिन परिस्थिती :-
पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत. कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून, चार 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत.
या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत.
- आपल्याला लक्षात येत असेल कि मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेत, बदलते हवामान परिस्थिती, काही वर्षात सरासरी पेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीं तर काही वर्षात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसायात आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. अशा प्रकारे बदलत्या नैसर्गिक घटकांचा शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असतो. तापमान वाढ, कमी अधिक पाऊस, हिमवर्षाव, शीतलहूरी, दोन पावसातील खंड यांचा शेती उत्पादनावर संख्यात्मक व गुणात्मक दोघे प्रकारे विपरीत परिणाम होत असतो.
- मान्सून उशिरा सुरू झाल्यास पेरणी लांबते तर पेरणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास वेळेवर पेरणी करणे शक्य होत नाही. पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबला तर त्याचा उगवलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊन कित्येकदा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवते. पेरणी वेळेवर झाली व पीकही चांगले वाढले तर काही वेळा पीक वाढीच्या अवस्थेत असताना किंवा दाणे भरण्याच्या वेळी पिकास शीत लहरींचा फटका बसल्यास पिकांचे नुकसान होते. अशा प्रकारे निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना लहान व सिमांतीक शेतक-यांना त्यांच्या उपजीविंकेचे साधन केवळ शेती असल्याने मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो.
आपत्कालिन पीक नियोजन :-
१. पश्चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग
२. महाराष्ट्र व खानदेश विभाग
३. विदर्भ विभाग
१.पश्चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग :-
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.
२.महाराष्ट्र व खानदेश विभाग :-
मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पावसाच्या अपेक्षित आगमन कालावधीनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी दिलेले पीक नियोजन.
३.विदर्भ विभाग :-
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना दिल्या आहेत. कृषी हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश व जास्त पावसाचा प्रदेश अशा तीन उपविभागांमध्ये विभागला जातो. या तिन्ही उपविभागांत ढोबळ मानाने एकाच वेळी पाऊस पडतो. या विभागांसाठी अभ्यासाअंती काही ठळक शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत.