मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या टोल नाक्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील टोल वसुली रविवारी (ता.२९) मध्यरात्री १२ वाजेपासून बंद करण्यात येत आहे. टोल वसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.