21 ट्रॅक्टर भरून अवैध सागवान, फर्निचर जप्त
नांदेड / प्रतिनिधी
मागील वर्षी 2018 साली 1 फेबु्रवारी रोजी चिखली गावात सागवान तस्कराविरोधात मोठी कार्यवाही केल्यानंतर पुन्हा या वर्षी 2 फेबु्रवारी रोजी भल्या पहाटे अतिशय गुप्त पध्दतीने चिखली व बुधवारपेठ गावातील अनेक घरामधून सागवान फर्नीचर व गोलमाल ,कटसाईजचे 21 ट्रॉली सागवान जप्त केल्याने कोणतीही अप्रीय घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाने 125 जवान,राज्य राखीव दल 30 जवान, महिला पुरुष अधिकारी तर वनविभागाचे 25 कर्मचारी , महिला -पुरुष याकामी तैनात करण्यात आले होते. सागवान तस्कारानी घरातील आरगलीचे ठिकाण व आवारात जवपासच्या शेतामध्ये जमीनीत पुरुण ठेवलेले सागवान मोठया शिताफीनेे जप्त केले.या कार्यवाहीत दोन बैल व बैलगाडया जप्त करण्यात आल्या.जप्ती करण्यात आलेले संपूर्ण सागवान राजगड येथे वन आगारात जमा करण्यात आले असून त्याची मोजमाप झाल्यानंतरच सागवानाची निचीत आकडा समजणार आहे.
सागवान तस्कराविरुध्द धडक कार्यवाही नांदेड वन विभागाचे उपवनसरक्षक आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. यावेळी किनवटचे सहा.जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमुख उपस्थीत होते. नांदेड पोलीस विभागाचे सुनिल निकाळजे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने व किनटचे पोलीस निरीक्षक दिलीप तितके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला राज्य राखीव पोलीस दलाचे पो.उ.नि. मडावी यांनी नेतृत्व केले.
किनवट उपविभागाचे सहा.वनसरक्षक डॉ.राजेद्र नाळे, नांदेड उपविभागाचे जि.एस.पवार, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी किसन खंदारे, श्रीधर कवळे, अविनाश तैनात ,अशिष हिवरे, ठाकूर, ढोके, शिवानंद कोळी, ए.व्ही. रातने ,जोेशी वनविभागाचे महिला व पुरुष कर्मचारी 60 व महिला वन कर्मचारी 20 महिला पोालीस कर्मचारी यांचा सहभाग होता. सकाळी 5.00 वाजता सुरु झालेली ब्ल्यू-मून -2 ऑपरेशन 10.00 वाजेपर्यंत सुरू होती.
चिखलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवार पेठ संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावातही अचानकपणे अवैध सागवान जप्ती करण्याचे मोहिम सुरु होताच सरंपचासह गावातील महिला पुरुषांनी आमच्या लेकी मुलांच्या आहेरात आलेले सागवान फर्निचर जप्त करु नका असा पावित्रा घेतल्याने वन अधिकारी यांनी फर्निचर त्यांना परत केले. चिखली गावात मात्र या कार्यवाहीत कोणीही विरोध न केल्याने वनविभागाने ही कार्यवाही शांततेत व सुरळीत पार पाडली.
आंतरपिक शेवगा लागवडीत अडिच लाखांचा नफा
दिंद्रुड
दिंद्रुड येथील शेतकरी मुंजा व उत्तरेश्वर पारेकर यांनी दोन एकर शेवग्याची रोपे लावली.7500 रुपयांत 600 ते सातशे रोपे दोन एकरात लावलेल्या पारेकर बांधवांना या उत्पादनातून जवळपास अडीच लाख रुपये नफा अवघ्या चार महिन्यात मिळाला आहे.
1 जुन 2018 रोजी दोन एकर शेतीमध्ये जवळपास 700 शेवग्याची रोपे पारेकर यांनी लावली होती. विहीरीतील पाण्याच्या बळावर शेवगा जोपासत अवघ्या सहा महिण्यात म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात शेवग्याच्या उत्पन्नात सुरुवात झाली. पहिला तोडा आठ हजार रुपयांचा नफा या शेतकर्यास मिळाला.तेंव्हापासुन तीन महिन्यांमध्ये जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न पारेकर बांधवांना शेवग्याच्या शेंगा पासुन मिळाले आहेत. लातूर व बीड येथील बाजारपेठेत शेवग्याला 50 रुपयाच्या प्रति किलो दराने विक्री होत आहे. आंतरपीक शेवगा लागवड करून दहा हजार रुपयांच्या खर्चामध्ये अडीच लाख उत्पन्न मिळाल्याने सदर शेतकर्याने इतर शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शिवराज थोटे या तरुण शेतकर्याची यशोगाथा
तीन महिन्यांत दोन लाखांच्या टोमॅटोचे उत्पादन
कुरुळा/प्रतिनिधी
कुरुळा परिसरात मागील चार ते पाच वर्षांपासून दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही केवळ एक एकर शेतजमिनीत उपलब्ध पाण्याच्या सिंचनाचे सुयोग्य नियोजन, योग्य खताची मात्रा आणि कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून सध्य स्थितीस बाजारात कमी ते मध्यम भाव असतानाही टमाट्याचे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे कुरुळा येथील तरुण शेतकरी शिवराज केरबा थोटे यांनी सांगितले आहे.
कुरुळा परिसराचा विचार करता काही खेडी वगळता सिंचनाचे प्रमाण कमी आहे. त्यात कुरुळा गावाची तर दुर्गम अत्यल्प सिंचन म्हणून ओळख आहे.अपवादात्मकच एखाद्या ठिकाणी तुरळक हिरवळ नजरेत भरते. कारण बहुतांश कोरडवाहू शेतीवरच शेतकर्यांचा उदरनिर्वाह,संसारप्रपंच चालतो.येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक असून शेतीसिंचनाविषयी राजकीय उदासीनता आणि निसर्गाची सततची अवकृपा अश्या दुहेरी संकटात सापडलेला आहे.परंतु कुरुळा गावातील 30 वर्ष वय असणार्या शिवराज थोटे या शेतकर्याने अश्या संकटावर मात करत आणि पारंपरिक पीक पद्धती यास फाटा देत इतर शेतकर्यांसाठी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.बोअरवेल च्या मुबलक पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून वडिलोपार्जित गावालगतच्या एक एकर जमीन क्षेत्रावर 440 गावरान टमाट्याच्या प्रजातीची तब्बल 8000 रोपाची चार बाय सव्वा फुटावर बांबू,दोरी व तार यांच्या आधाराने लागवड केली आहे.शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत फायद्याची शेती कशी करायची याच उत्तम उदाहरणच त्यांनी शेतीत काय पडलं आहे असं म्हणणार्या साठी दाखवून दिलं आहे.आता शिवराज यांच्या शेतात प्रत्येकी एक दिवसाआड 100 कॅरट टमाटे फळभाजीची तोड होते.एका कॅरट मध्ये साधारणतः वजनी22 किलो टमाटे निघत आहेत. प्रत्येकी टमाट्याच्या पालविला पाच ते सहा किलो टमाटे निघत असल्याचे शिवराज यांनी सांगितले.घरच्या आर्थिक परिस्थितीची दारोमदार पुर्णतःजिरायती शेतीवर असल्यामुळे जेमतेम उत्पन्न व्हायचे त्यातून कसाबसा प्रपंच चालायचा.दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या या शेतीसाठी त्यांनी हा टमाटे लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला.आजमितीस बाजारात टमाट्याचे दर 10 ते 15 रुपये किलो प्रमाणे आहेत.सद्यस्थितीस प्रति कॅरट 150 ते200 रुपये भाव शिवराज याना मिळत असून एकरी खत,इतर साहित्य,फवारणी औषध, इतर मजुरी आणि तत्सम 50 हजार रुपये खर्च वगळता साधारणपणे तीन महिन्यात 2 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.अशी शिवराज थोटे यांची यशोगाथा इतर शेतकर्यांसाठी आदर्श ठरू शकते ज्यामुळे सतत नैराश्येच्या गर्तेत जगणार्या शेतकर्यांना प्रेरणादायी होऊन जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी गटशेती आवश्यक
: जलतज्ञ बाबुराव केंद्रे
माळाकोळी/प्रतिनिधी
शेतकरी सध्या अर्थिक आडचनीत सापडला आसुन उत्पादन खर्चावर आधारीत शेती करणे काळाची गरज तर आहेच पण अर्थिक स्तर उंचावयाचा आसल्यास गट शेतीशिवाय सध्या तरी तरणोपायच नाही आसे उद्गगार जलतज्ञ बाबुराव केंद्रे यांनी पंतप्रधान कौशल्य विकास अभियानातंर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रम माळाकोळी येथे केले.पंतप्रधान कौशल्य विकास आभियानांतर्गत आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला, 30 जानेवाारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक विभागांचे अधिकारी व प्रशिक्षीत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले व अनेक योजनांची माहीती मिळाली तसेच गटशेती व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना यासंबंधीची कार्यशाळा घेण्यात आली. दि 30 जानेवारी रोजी या तीन दिवसीय शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी सरपंच चंद्रमुनी मस्के, माऊली गिते, पांडुरंग नागरगोजे, विलास केंद्रे, नरेंद्र बल्लोरे, बाबुराव केंद्रे,बाबासाहेब पाटील ,तलाठी फड, ग्रामविकास अधिकारी दावनगावे, केशवराव तिडके यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. प्रशिक्षक राम कोरके व जवरकर यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकर्यांना पीक व्यवस्थापन, गटशेतीचे महत्व, शेतकरी उत्पादन कंपनी स्थापना व कार्यपद्धती, किड नियंत्रण, अन्न प्रक्रीया व काढणी पश्चात व्यवस्थापन, तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहीती दिली.अजुनही आठ आठवडे जोड कार्यक्रम राबवला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणविस, कृषी पर्यवेक्षक बेंबडे, आत्माचे जिल्हा समन्वयक सुरज पाटील, कृषी सहायक गुंडवाड, कोपनर मॅडम, चव्हाण, यांनी शेतकर्यांना विविध योजनांची माहीती दिली तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापन सर्कल समन्वयक एकनाथ तिडके यांनी केले तर माऊली गिते, विनोद मस्के, नागनाथ पुरी, विनायक जोशी, सतिष कुलकर्णी, सुनील सोनटक्के,सुधाकर राठोड यांनी सहकार्य केले.