ऊतिसंवर्धन ( टिश्यू कल्चर ) भाग- ५

1

ऊतिसंवर्धन : वनस्पतीची एखादी पेशी, पेशीचा समुह पान, मूळ अथवा खोडाचा भाग तुकडा पोषक माध्यम वापरून नियंत्रीत वातावरणात प्रयोगशाळेत वाढविला जातो. या तंत्रात ऊतिसंवर्धन (टिश्यू कल्चर) असे म्हणतात .

शाकीय पेशी किंवा शरीर पेशीपासून पूर्ण सजीव तयार करण्यासाठी शक्ती वनस्पतीमध्ये आढळते. या गुणधर्मावरच आधारीत ऊतिसंवर्धन तंत्र उदयास आले आहे. भारतासारख्या शेती प्रधान देशात ऊतिसंवर्धन या तंत्राच्या विकासाने कृषी संशोधन व विकास यासाठी एक नवे दालन निर्माण झालेले आहे. विविध पिकांमध्ये विशिष्ट करणास्तव ऊतिसंवर्धनाद्वारे जलद विकास घडविण्यासाठी जगभर तसेच भारतात अहोरात्र प्रयत्न चालू आहे.

 

ऊतिसंवर्धन करण्याची पद्धत :

ऊतिसंवर्धन पद्धत ही छाट कलमासारखीच असून त्यामध्ये एक सें.मी. पेक्षा कमी लांबीचे खोड, मूळ, पान, फुल, मुकुल यांचे तुकडे उपयोगात आणले जातात. वनस्पतीच्या प्रत्येक पेशीमध्ये त्याच जातीची परिपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे एका डोळ्यापासून अनेक रोपे तयार करता येतात. या गुणधर्माच्या ऊतिसंवर्धन तंत्रामध्ये वापर केला आहे. ही सारी किमया परीक्षा नळीमध्ये ठेवलेल्या निर्जंतूक कृत्रिम पोषक मध्यामावर की ज्यामध्ये अन्नद्रव्ये, अॅमीने अॅसीड, साखर, संजीवक इत्यादींचा योग्य प्रमाणात समावेश असतो.

प्रयोगशाळेत कृत्रीम आणि नियंत्रित वातावरणामध्ये निर्जतुक केलेले मुकूल / डोळे या पासून अल्प काळात पाने आणि मुळे असलेली बहुमुखी अंकुर निर्माण करून त्याच जातीची रोगमुक्त रोपे जलद गतीने व मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात. प्रयोगशाळेत तयार केलेली रोपे बाहेर अल्यानंतर त्याचे ट्रे मध्ये कोकोपीट या माध्यमात रोपण केले जाते व नंतर हि चार आठवडे पॉलीहाउस (विनिंग हाउस ) मध्ये ठेवली जातात. तेथे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित केली जाते. या रोपांना चांगली मुळे आल्यानंतर ती प्लास्टिक पिशव्यात लावली जातात. व त्यांना शेड हाउस मध्ये ठेवून योग्य त्या तापमानामध्ये व योग्य आर्द्रते मध्ये वाढविली जातात या क्रियेला हार्डनिंग किंवा बळकटीकरण असे म्हणतात. अशा प्रकारे तीन ते साडे तीन महिने वयाची व ५ ते ६ पाने असलेली रोपे लागवडीस वापरली जातात.

ऊतिसंवर्धन तंत्रज्ञानाचे फायदे :

१) ऊतिसंवर्धन तंत्रज्ञानामुळे रोगमुक्त फुलझाडाची व जलद गतीने शाखीय अभिवृद्धी करणे शक्य आहे.

२) उत्कृष्ट गुणधर्म असलेल्या मातृवृक्षाच्या अवयवापासून हव्या त्या प्रमाणात जातिवंत रोपांची निर्मिती करणे शक्य होते.

३) तयार रोपे एकाच वयोमानाची उत्कृष्ट गुणधर्मांची आणि निरोगी असल्यामुळे एकाच वेळी दर्जेदार व जास्त उत्पादन मिळते.

४) बियाणे वापरण्याची अवश्यकता नसल्यामुळे वर्षभर पाहिजे तेव्हा रोपांची निर्मिती करता येते.

५) वनस्पतिच्या कोणत्याही भागपासून वनस्पतीची निर्मिती करता येते त्यामुळे नवीन प्रसारीत  केलेल्या फळझाडाच्या संकरीत व सुरक्षित जातीची रोपे जलद गतीने मोठ्या प्रमाणात तयार करणे शक्य होते.

६) रोपे पूर्णतः निरोगी असल्यामुळे व रोपांचे बळकटीकरण केल्यामुळे नैसर्गिक वातावरणात      वाढविण्यात अडचण येत नाही.

७) वैशिष्टपूर्ण गुणधर्म असलेल्या नवीन सुधरित जातीची निर्मिती व अभिवृद्धी करणे शक्य होते.

८) एका डोळ्यापासून एका वर्षात अनेक रोपे तयार करता येतात. त्यामुळे मातृवृक्षाची कमतरता असली तर अडचण येत नाही.

९) दुर्मिळ अवघड अशा वनस्पतीची अभिवृद्धी करून त्यांचे संवर्धन करणे शक्य होते.

१०) अल्पावधीत थोडया जागेत असंख्य रोपे तयार करता येतात.

ऊतिसंवर्धनातील काही मर्यादा:

१. ही पद्धत सर्वच पिकात वापरता येत नाही.

२. ही पद्धत सर्वसामान्य पद्धतीसाठी वापता येत नाही.

३. मुळची निवड चुकल्यास किंवा रोप वाढविताना दुर्लक्ष झाल्यास, स्वच्छता, निकोप वातावरण न ठेवल्यास मोठया प्रमाणात व्हेरीएशन येते, किंवा तो लॉट वाया जातो.

https://krushisamrat.com/preparation-of-vegetable-nursery-part-6/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. […] ऊतिसंवर्धन ( टिश्यू कल्चर ) (भाग-५) […]

Leave A Reply

Your email address will not be published.