जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवी ऊर्जा

0

सांगली:
सांगली जिल्हा कृषी महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नवी ऊर्जा मिळेल. हा महोत्सव राज्याला व जिल्ह्याला दिशादर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव सांगता कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, उपसंचालक सर्जेराव फाळके व सुरेश मगदूम व सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा कृषी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना मिळण्यास मदत झाली. महोत्सवातील चचासत्रातून जगातील कृषी विषयक घडामोडींची माहिती शेतकर्‍यांना झाली. महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व कृषी संलग्न विभाग, महसूल, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन केले आणि अंमलबजावणीसाठी मेहनत घेतली. त्यामुळेच हा कृषी महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. या महोत्सवास जवळपास साडेपाच लाख शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. यासाठी सर्व संबंधित विभागांनी व स्थापन केलेल्या समित्यांनी समन्वयाने काम केले. त्यामुळेच या महोत्सवाचे नेटके आणि शिस्तबध्द नियोजन होऊ शकले, असे ते म्हणाले.
आत्मा अंतर्गत शेतकरी गट, सेंद्रिय शेती गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या मालाला धान्य महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शनात विक्री करण्यात आली. त्यामध्ये 28 धान्य बोल सेंद्रिय उत्पादने, कडधान्य प्रक्रिया केलेले पदार्थ, गाईच्या शेण व मूत्र पासून तयार केलेले तूप व इतर प्रसाधने इत्यादी विक्रीतून 50 ते 60 लाख रूपयांची उलाढाल झाली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली यांच्यामार्फत आयोजित कृषि महोत्सव 2019 शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा ठरला आहे.
यावेळी स्टॉलधारकांना प्रकल्प संचालक आत्मा सांगली कार्यालयामार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे म्हणाले, शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा हा कृषी महोत्सव ठरला आहे. कृषी महोत्सवात सहभागी झालेल्या विविध शासकीय दालने, सूक्ष्म सिंचन व निविष्ठा दालने, कृषी तंत्रज्ञान व अवजारे, ग्राहक उपयोगी वस्तू व धान्य महोत्सव इत्यादी महोत्सवाच्या आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व विभागांचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे व प्रकल्प संचालक आत्मा बसवराज मास्तोळी यांनी यावेळी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सुरेश मगदूम यांनी मानले व कृषी महोत्सवाची सांगता संपन्न झाली.

 

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.