भोकरदनच्या शेतकर्याचा मृत्यू
औरंगाबाद / प्रतिनिधी
मराठवाड्यात तीन शेतकर्यांनी नापिकी व कर्जबाजारीतून आत्महत्या केल्या आहेत. पैकी दोन आत्महत्या लातूर जिल्ह्यात तर एक जालना जिल्ह्यातील आहे. या शिवाय लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकर्याचा विद्यूत डीपीला चिकटून मृत्यू झाला.
निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीच्या ग्यानदेव लक्ष्मण निकम या शेतकर्याने नापिकीमुळे व कर्जाला कंटाळून शनिवारी (दि.12) सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्न घटल्यामुळे आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
खानापूर (मो.ता.अहमदपूर) येथील शेतकरी वैजनाथ रावसाहेब शिंदे (51) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. रविवारी त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले.
तारेला चिकटून शेतकर्याचा मृत्यू
अन्य एका घटनेत डोंगरगाव (बो.) येथील तरुण शेतकरी बळीराम लिंबराज मोहिते (28) गावाजवळ डीपीचा करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. मयत बळीराम मोहिते यांना तीन मुली, एक मुलगा, एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. बळीराम यांना पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल