गुळ निर्मिती

1
 •  प्रस्तावना  

भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला क्रमांक हा गुळाचा लागतो. गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात. दुधात गुळ घालून ते पिल्याने हाडे मजबूत बनतात. गुळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ तर रामबाण उपाय आहे. गुळ विविध पदार्थांमध्ये गोडवा आणण्याचे काम तर करतोच शिवाय गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.

 • गुळाची निर्मिती कशी करावी.

ऊसाचे पिक परिपक्व होण्यासाठी साधारणपणे एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. गुळाची निर्मिती करण्याकरिता ऊसाची तोडणी करण्याअगोदर ऊस पूर्ण परिपक्व होणे आवश्यक असते. कारण पूर्णतः परिपक्व न झालेल्या उसापासून गुळाचा उतारा कमी मिळतो, गूळ नरम बनतो. गूळ रवाळ होत नाही. साठवण करतेवेळी असा गूळ खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच योग्य प्रमाणात पक्व झाल्यानंतरच ऊसाची तोडणी करावी. एकदा का पक्वतेची चाचणी घेतली कि त्यानंतर धारदार कोयत्याने पक्व उसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे बुडक्या कडील जास्त साखर असलेल्या कांड्या वाया जात नाहीत. ऊसावरील मुळ्या, पाचट, माती काढून ऊस स्वच्छ करून घ्यावा. ऊसाच्या शेंड्याकडील दोन ते तीन कोवळ्या अपक्व कांड्या वाढ्याबरोबर तोडून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाण्याचे, नत्राचे आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तर साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते, त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

 • गुळ निर्मितीसाठी महत्वाचे मुद्दे:-
 1. उसाची तोडणी झाल्यानंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे, अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढून रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. त्याचा गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
 2. ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरक्‍याची निवड करावी.
 3. गुऱ्हाळासाठी चरक्‍याची गाळप क्षमता 65 ते 70 टक्केपर्यंत असावी. गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
 4. उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
 5. स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्‍याचा वापर करणे अतिशय महत्वाचे असते.
 6. द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन “फूड ग्रेड’चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
 7. हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.
 8. रस उकळण्यासाठी सुधारित काहिलीचा वापर करावा. या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे 16 टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये 15 टक्‍क्‍यांची बचत होते.
 9. रस उकळण्यासाठी चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहिल उतरण्यासाठी “फ्रेम- चाके- रूळ’ यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

http://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

1 Comment
 1. राहुल मोटघरे says

  गूळ खराब होतो का ? त्याला बुरशी येते का?

Leave A Reply

Your email address will not be published.