ठिबक सिंचन-समज / गैरसमज

1

१) ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाणी वापरात किती बचत होते?

उत्तर:- ठिबक सिंचन पद्धतीमुळे पिकानुसार सुमारे ४५-६० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होते.

२) ठिबक सिंचन पद्धतीत रानबांधणी व लागवड पद्धतीत बदल करावे लागतात का?

उत्तर:- ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीची रानबांधणी करण्याची जरुरी भासत नाही.चढ उतार लक्षात घेऊनच ठीबकची रचना करता येते. ठिबकचा वापर करताना लागवडीमध्ये बदल करावे लागतात. त्यामुळे मशागत करणे सोयीस्कर होते.

३) ठिबक सिंचन पद्धतीत रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते का ?

उत्तर:- ठिबक पद्धतीत मुख्य मूलद्रव्ये असलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.पिकांना समप्रमाणात खाते देता येतात.पाणी मर्यादित स्वरुपात दिल्यामुळे, खते मुळांच्या कार्यक्षम कक्षेत राहिल्यामुळे खतांचा उपयोग कार्यक्षमरित्या होतो.

४) ठिबक सिंचनाच्या वापराणे तणांच्या वाढीवर काय परिणाम होतो ?

उत्तर:- ठिबक सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांच्या मुळांजवळ अपेक्षित क्षेत्रावर पाणी दिले जाते. न भिजलेल्या क्षेत्रावर तानांची तीव्रता कमी असते. परिणामी जमिनीतील तण नियंत्रणाचा खर्च त्याप्रमाणात कमी होतो. शिवाय तणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुख्य पिकांना जमिनीतील अन्नद्रव्यांचा चांगला उपयोग करून घेता येतो.

५)ठिबक सिंचन पद्धतीमुळे रोग व किडींचे प्रमाण कमी होते का?

उत्त्तर:-ठिबक सिंचन पद्धतीत रोपांची व झाडांची वाढ निरोगी असल्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पिकांच्या संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चात बचत होते.शिवाय पाण्याद्वारे पसरणारे रोग टाळले जातात किंवा कमी प्रमाणात होतात.

६) ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या वाढीत परिणाम होतो का?

उत्तर:- ठिबक पद्धतीत ठराविक क्षेत्रावर पाणी दिले जात असल्यामुळे मुळांची वाढ त्याच ठराविक क्षेत्रात होते. उससारखेपिक वाढल्यानंतर ते काही प्रमाणात लोळल्यासारखे आढळते. मुळांच्या ठराविक वाढीमुळे नारळासारखी झाडे नैसर्गिक आपत्तीमध्ये उन्मळून पडण्याचा धोका असतो.

७)ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या वाढीवर परिणामहोऊ नये म्हणून कोणती उपाययोजना करावी?

उत्तर:- उस पिकासाठी छोटी व मोठी खांदे भरणी वेळेवर व योग्य प्रकारे केल्यास उस लोळण्याचे प्रमाण कमी होते. मुळांच्या ठराविक वाढीमुळे नारळासारखी झाडे नैसर्गिक आपत्तीमध्ये उन्मळून पडू नये यासाठी पिकामध्ये अथवा प्रत्येक झाडासाठी आवश्यक भिजणारे क्षेत्रफळ काढून घेऊन त्यानुसार पाणी देणे जरुरीचे आहे.

८) ठिबक सिंचन पद्धतीच्या अर्थशास्त्रावर परिणाम करणारा महत्वाचा घटक कोणता?

उत्तर:- उपनऴ्या(लॅटरल्स) आणि तोट्या(ड्रीपर्स) मधील अंतराचा परिणाम इतर घटकांपेक्षा जास्त होतो. दोन उपनऴ्यांमधील जर फार कंमी असेल,तर ऐकूण क्षेत्रासाठी लागणाऱ्या उपनऴ्यांची संख्या वाढून खर्च वाढतो. जर हे अंतर खूप जास्त असेल, तर पिकांना व्यवस्थित पाणी न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे उपनऴ्यांमधील अंतर आवश्यक तेवढे ठेवावे.

९) दीर्घकाळ ठिबक सिंचनामुळे मुळांच्या सान्निध्यात क्षारांचे प्रमाण वाढते. पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो का ?

उत्तर:- ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास क्षारांचे प्रमाण ठराविक क्षेत्रात वाढते. हे क्षार मुळांच्या कार्यक्षेत्राबाहेर वाढतात. त्यामुळे अनिष्ट परिणाम होत नाहीत.

१०) ठिबक सिंचनामुळे खोडाजवळच्या मुळांना पाणी मिळत असल्यामुळे झाडावर काहीअनिष्ट परिणाम होतो का ?

उत्तर:- पिक वाढीच्या आवश्यकतेनुसार तोट्यांची योग्य संख्या योग्य दिशांना ठेवून आखणी केल्यास झाडांवर अनिष्ट परिणाम होत नाही.

११) ठिबक पद्धतीत मनुष्यबळात किती बचत होते ?

उत्तर:- ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीची कमी मशागतकरावी लागते. याशिवाय गवत व तण यांची मर्यादित वाढ होते. त्याकरिता करावी लागणारी मशागतदेखील वाचते. तसेच पाणी व खते देण्यासाठी कमी मनुष्यबळ लागते. त्यामुळे ऐकूण २०-२५ टक्के कमी मनुष्यबळ लागते.

१२) ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणारया उपनऴ्यां व ड्रीपर हे मुख्यतः प्लास्टिकपासून बनवले जातात; त्याचा पर्यावरण संतुलन वजमिनीची प्रत बिघडवण्यावर परिणाम होऊ शकतो का ?

उत्तर:- ठिबक सिंचानामध्ये वापरल्या जाणार्या प्लास्टिकचे प्रमाण हे जमिनीच्या / सिंचनक्षेत्राच्या प्रमाणात खूपच कमी असते. त्यामुळे त्याचा जमिनीची प्रत बिघडण्यावर परिणाम होत नाही. सध्या पर्यावरण संतुलनाबाबत ठिबक क्षेत्राचा विचार करता प्रश्न उद्भभवत नाही.

१३) तुषार सिंचनामुळे पिकावरील कीड/रोग  धुवून जातो आणि ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत जास्त होते,तर दोन्हीपैकी चांगली पद्धत कोणती ?

उत्तर:- पाण्याची कमतरता असणाऱ्या प्रदेशात तसेच जास्त पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशातही पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पन्न वाढीसाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे. परंतु कमी उंचीच्या व जास्त घनता असणाऱ्या पिकामध्ये तुषार सिंचन उपयोगीआहे.

 

१४) ठिबक सिंचन कोण कोणत्या पिकांना उपयुक्त आहे?

उत्तर:- उस, कापूस, केली, पपई, हरभरा, मिर्ची, भेंडीव इतर भाजीपाला तसेच सर्व फळपिके.

१५) ठिबक सिचन पद्धतीसाठी निवडण्याची गाळण यंत्रणा कशावर अवलंबून असते?

उत्तर:- पाण्याच्या स्रोताच्यागुणवत्तेवर गाळण यंत्रणा अवलंबून असते.

१६) गाळण यंत्रणेची निवड कशी करावी?

उत्तर:- पाण्याच्यास्त्रोतात जर जड जड मातीचे कण असतील तर हायड्रोसायक्लोन गाळणीवापरणे गरजेचे असते. जर पाण्यात शेवाळ अथवा सेंद्रिय घटक असतील तर वाळूची गाळणी गरजेची असते. सर्वसाधारण परीस्थितीत जाळीची गाळणी वापरणे गरजेचे असते.

१७) ठिबक सिंचनातील इनलाईन व ऑनलाइन पद्धती पिकासाठी कश्या निवडाव्यात?

उत्तर:- कमी अंतरावरील भाजीपाला पिकांसाठी शक्यतो इनलाईन ठिबक पद्धत तर फळझाडासारख्या अधिक अंतरावरील पिकांसाठी ऑनलाईन ठिबक पद्धत वापरावी.

१८) उंदीरआणि घुशींचा त्रास सूक्ष्म सिंचन पद्धतीत होऊ नये म्हणून की उपाय करावे?

उत्तर:-उंदीर आणि घुशीना काहीतरी कुरतडण्याची सवय असते. यासाठी लॅटरल्सचे छोटे तुकडे शेतात ठिकठिकाणी टाकावेत. तसेच या प्राण्यांना पिण्यासाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवावे. आता उंदीर प्रतिरोधक लॅटरल बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा

१९) सिंचनासाठी पाण्यावरील आणि पाण्यातील पंपापैकी कोणता पंप निवडावा?

उत्तर:- सिंचनासाठी पाण्यातील (पाणबुडी) पंप निवडणे चांगले, म्हणजे पंपात पानी भरणे, फुटवॉल्वने पाणी सोडणे असे प्रश्न निर्माण होत नाहीत. तसेच पाण्याच्या स्त्रोतामध्ये खूप गाळ असल्यास पाण्याबाहेरील पंप निवडावा.

२०) सुक्ष्म सिंचनाद्वारे कोणत्या वेळेस पिकांना पाणी द्यावे?

उत्तर:- दिवसा उन्हात पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते, तसेच वाऱ्याच्या वेगामुळेफवारा पद्धतीवर परिणाम होतो. यासाठी पाणी शक्यतो सूर्य उगवण्यापूर्वी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर देणे संयुक्तिक ठरेल.

२१) ठिबकच्या तोट्यांवर पांढरा साका साठून तोट्या बंद पडतात. यावर काय उपाय करावा ?

उत्तर:- ठिबकच्या तोट्यांवरीलपांढरा साका हा पाण्यातील रासायनिक घटकांमुळे तयार होत असतो. यासाठी अॅंटीलिक लॅटरल वापराव्यात. तसेच ठिबक संचातून पाण्यातून आम्ल( सल्फ्युरिक आम्ल) ०.१ ते ०.५ N तीव्रतेचे जरुरीनुसार एक आठवडा ते दहा दिवसांच्या अंतराने सोडावे .

https://krushisamrat.com/hibak-sinchan-ek-vardan-drip-irrigation/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] ठिबक सिंचन-समज / गैरसमज […]

Leave A Reply

Your email address will not be published.