पाण्याच्या बेहिशोबी अवाजवी आणि अनुत्पादिक वापरामुळे शेतीपुढे पाण्याचे संकट उभे राहिले आणि मानवजातीला वाचवले ते पाण्याच्या एका थेम्बाने.पाण्याचा एक थेंब तारणहार बनला ! पुन्हा एकदा हिरवी शेत डोलू लागली आणि हे शक्य झाले ते सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानामुळे.ठिबक सिंचन पद्धती शेतीसाठी वरदान म्हणून पुढे आली आणि पाणी टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांची तारणहार बनली.
सिंचनासाठी योग्य आणि शाश्वत पर्याय म्हणजे ठिबक सिंचन.या सिंचन पद्धतीत मुख्यलाईन (मेन लाईन) किंवा पार्श्व लाईनच्या(सबलाईन) तंत्राने त्याच्या लांबी नुसार उत्सर्जन बिंदूंचा(इमी टर) उपयोग करून पाणी मोजून मापून विधीपूर्वक नियंत्रित एकसमान निर्धारित मात्रेत वाया जाऊ न देता पिकांच्या थेट मुळाशी पोहोचविले जाते.विशेष म्हणजे फक्त पाणीच नाही तर खते,पिक संरक्षक रसायने,संजीवके पिकांच्या थेट मुळापर्यंत पोहचविता येतात त्यामुळे शेतकरयास उच्च प्रतीचे व जास्त उत्पन्न घेण्यास ठिबक सिंचन खूप उपयोगी ठरते.
ठिबक सिंचन पद्धतीचा कार्यक्षम पद्धतीने वापर करावयाचा असल्यास त्याची योग्य निवड करणे आवश्यक आहे.कारण बहुतेक पिकांच्या कार्यक्षम मुळाची कक्षा हि 30 ते 50 से.मी खोलीपर्यंत असते.पिकांसाठी अन्न व पाण्याचे शोषण मुळाद्वारा याच थरातून केली जाते म्हणून ओलिताची खोली नियंत्रित करणाऱ्या ठिबक सिंचन संचाचीच निवड करणे आवश्यक आहे.म्हणजेच कमी अंतरावर कमी उत्सर्ग( लो स्पेसिंग लो डिस्चार्ज ) असणारे ठिबक निवडल्यास ओलिताची खोली नियंत्रित करणे सहज शक्य होते.ह्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी व खतेयांचा कार्यक्षम वापर केला जातो व पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
बहुतेक सर्व पिकांसाठी ठिबक निवडताना नळीच्या आतून ड्रीपर असणारी तसेच कमी अंतर – कमी विसर्ग असणारी ठिबक सिंचन यंत्रणा ( लो स्पेसिंग लो डिस्चार्ज ) निवडणे फायद्याचे असते.पिकांच्या वाढीची अवस्था,पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार वहवामान इत्यादी गोष्टींचा विचार करून आपणास पिकला लागणारे पाणी व खाते मोजून मापून देता येत असल्याने ठिबक सिंचन हिश्रेष्ठ सिंचन प्रणालीआहे
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.