मुंबई – महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, भूजल पातळी आदींची माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास पकडत मदत व पुनर्वसन विभागाने ‘महा मदत’ या नवीन संकेतस्थळाचे व ॲपची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. तेव्हा त्यांनी राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती नाही, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.