गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

0

जगभरातील अनेक संशोधकांनी मिळून गव्हाच्या कठीण जीनोमची निर्मिती केली आहे. त्यामुळे शेतकरी आता गव्हाचे विक्रमी उत्पादन तर घेऊ शकतीलच, याशिवाय त्यांच्या गहू पिकावर किडी-पतंग कीडीचाही प्रादुर्भाव होणार नाही. संशोधकांच्या १३ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही टीम गव्हाच्या जीनोमची निर्मिती करण्यात यशस्वी झाली आहे.

विशेष म्हणजे या संशोधकांच्या समूहात १८ भारतीय संशोधकांचा समावेश आहे. १७ ऑगस्ट रोजी इंटरनॅशनल व्हीट जीनोम सीक्वेंसिंग कंसोर्शियमने (आयडब्लूजीएससी) जर्नल साइंसमध्ये गव्हाच्या या जीनोमची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या जीनोमची निर्मिती करणे हे या संशोधकांसाठी एक स्वप्न होते.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, गव्हाच्या कठीण जीनोमची निर्मिती करण्यात यश मिळाल्याने हवामान बदलांना सामोरे जात, गव्हाच्या सक्षम प्रजाती विकसित करण्यास मदत मिळणार आहे. कृषी उत्पादन आणि हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यांनी या शोधकार्यात सहभागी असलेल्या भारतीय संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

जटिल आणि असंभव समजल्या जाणाऱ्या गव्हाच्या जटील जीनोमला मात्र आता या शोधानंतर उत्पादन आणि अन्नधान्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या जीनोमला ओळखता येणार आहे. याशिवाय आता गव्हाच्या पिकावर पडणारा रोग आणि किडींनाही नियंत्रित केले जाऊ शकणार आहे. गहू पिकासाठी तापमानातील बदल ही सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, आता या जीनोमच्या निर्मितीनंतर या समस्येपासून सुटका होणार आहे. कारण आता हवामान, वातावरणातील बदलाच्या अनुरूप जातींची निर्मिती केली जाणार आहे. संशोधकांनी या जीनोमची निर्मिती अशा वेळी केली आहे, ज्यावेळी जगभरात गव्हासह अन्नधान्याच्या इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे. २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या ९.६ अब्ज इतकी होऊ शकते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षी जागतिक गहू उत्पादनात १.६ टक्क्यांनी वाढ करण्याची गरज आहे.

या संशोधकांच्या टीममध्ये प्रोफेसर नागेंद्र सिंह (आईसीएआर-राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र),  डॉ.कुलदीप सिंह (पंजाब कृषी विद्यापीठ), जे.पी. खुराना (दिल्ली विद्यापीठ) या भारतीय संशोधकांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. नागेंद्र सिंह यांनी सांगितले आहे की, “माझ्यासाठी या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीममध्ये सामील होणे खूप मोठी बाब आहे. भारत जागतिक गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ३० मिलियन हेक्टरवर जवळपास ९८ मिलियन टन गव्हाचे उत्पादन होते. गव्हाचा जीनोम तांदळाच्या जीनोमच्या तुलनेत ४० पटीने तर मानवी जीनोमपेक्षा ५ पटीने मोठा असतो.”

जगभरातील २० देशांच्या २०० संशोधकांनी मिळून या जीनोमची निर्मिती केली आहे. नागेंद्र सिंह, डॉ.कुलदीप सिंह आणि जे.पी. खुराना यांच्यासह १८ भारतीय संशोधकांनी या जीनोमची निर्मिती करण्यासाठी आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. या जीनोम निर्मिती प्रकल्पासाठी ७५ मिलियन अमेरिकी डॉलरचा खर्च आला आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक पिकांची जीनोम निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये तांदूळ(२००५), सोयाबीन (२००८), मका (२००९) आणि टोमॅटो (२०१२) या पिकांचा समावेश आहे. मात्र, गव्हाच्या जीनोम निर्मितीसाठी संशोधकांना खूप कष्ट घ्यावे लागले आहेत.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.