आखाड्यावरून बैलजोडीची चोरी
बोरी / प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील (जि. परभणी) हाट्टा येथील गट क्र. 24 मध्ये मच्छिंद्र बापूराव इक्कर यांनी आखाड्यावर बांधून ठेवलेली बैलजोडी चोरी झाल्याची घटना 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हट्टा येथील मच्छिंद्र बापूराव इक्कर यांनी 6 जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या आखाड्यावर बैलजोडी बांधून घरी परत आले. दुसर्या दिवशी सकाळी इक्कर शेतात गेल्यानंतर बैलजोडी चोरी झाल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शोध घेतला असता बैलजोडी सापडली नाही.
याप्रकरणी मच्छिंद्र बापूराव इक्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यापासून चोरीच्या सात घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करूनही चोरी झालेल्या बैलांचा अद्यापही पूर्ण तपास लागला नाही. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोपींचा तात्काळ शोध लावावा, अशी मागणी होत आहे.