केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील एडामुककल गावातील एका शेतकऱ्याच्या बागेत चक्क ५१ किलो वजनाचा फणस आढळून आला आहे. या फणसाची नोंद जगातील आकाराने सर्वात मोठा फणस म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्यासाठी जॉनकुट्टी नावाच्या या शेतकऱ्याने अर्ज केला आहे.
जॉनकुट्टी या संदर्भात म्हणाले पूर्वीचे सर्वात मोठ्या फणसाचे रेकॉर्ड महाराष्ट्रातील पुण्याच्या नावावर आहे याची खात्री करून घेतली आहे. तो फणस ४२.७२ किलोचा होता. आमच्या बागेत आलेला फणस ५१.४ किलो वजनाचा आणि ९७ सेंटीमीटर लांबीचा आहे. त्यामुळे गिनीज आणि लिम्का साठी अर्ज करण्याचा विचार केला.
गिनीज बुक मध्ये जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीची असामान्य प्रतिभा नोंदविली जाते. त्यासाठी केलेल्या रेकॉर्डची माहिती देऊन अर्ज करावा लागतो. गिनीजची टीम या संदर्भात खात्री करून घेते आणि मगच संबंधित गोष्ट नोंदवून घेतली जाते. याची सुरवात १९५८ पासून झाली. १९९८ मध्ये त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स असे होते नंतर ते बदलून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स असे केले गेले आहे.