उस्मानाबाद
गतवर्षी यवतमाळ जिल्हयामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतकर्यांना जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व सिझेन्टा इंडिया लि. कंपनी याव्दारे कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी, काळजी व संरक्षण या कार्यक्रमामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी संरक्षण कीट वापरणे गरजेचे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले.
कीटकनाशक फवारणी काळजी व संरक्षण जनजागृती कार्यक्रम 100 गावांमध्ये, 5000 संरक्षण कीट, शेतकरी समुपदेशन, 100 भिंतीचित्र, प्रबोधन गाडी, 200 डॉक्टर प्रशिक्षण इ. उपक्रम सिझेन्टा इंडिया लि. याद्वारे करण्यात आले आहेत. अशी माहिती डॉ. के. सी. रवी उपाध्यक्ष उद्योग स्थिरता दक्षिण आशियाई सिझेन्टा कंपनी यांनी शेतकरी बांधवांना दिली. कीटकनाशक फवारणी करताना व केल्यानंतर घ्यावयाची काळजी, प्रथोमपचार पध्दती, संरक्षण कामे वापर व काळजी, संरक्षण कीट वापरण्याचे पाच विशेष नियम इत्यादी विषयावर या तंज्ञाकडून विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, रोजनदारीवर फवारणी करणार्या व्यक्ती यांना समुपदेशन व संरक्षण कीट यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय सभागृह, वाशी येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी कृषी विकास अधिकारी चिमन्न शेटटी, अतिरिक्त प्रकल्प संचालक आत्मा केशव मंलगुडे, गटविकास अधिकारी वाशी श्रीमती चव्हाण, शिवार संसदेचे विनायक हेगाणा आभार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर, शेतकरी, शेतमजूर, महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व सिझेन्टा इंडिया लि. कंपनीचे, शिवार फौंडेशनचे संरक्षण कीट वाटपासाठी विशेष सहकार्य मिळाले.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल