केंद्र सरकारने घेतला धाडसी निर्णय कृषी यांत्रिकीकरणातून ट्रॅक्टर अनुदानात लाखांपर्यंत अनुदान. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे ट्रॅक्टर उद्योगातून स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) यंदा ट्रॅक्टरसाठी अनुदान न देण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. तसेच राज्य शासनाकडून मात्र अनुदानासाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. मागच्या वर्षी राज्यात यांत्रिकीकरणापोटी ३६४ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. त्यापैकी १८० कोटी रुपये ट्रॅक्टर अनुदानाकरिता वाटले गेले आहेत.
‘यांत्रिकीकरणाच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांना ह्या वर्षी कमीत कमी २५० कोटी रुपये मिळावेत, असा प्रयत्न सुरू आहे. त्यातील २०० कोटी रुपये ट्रॅक्टर व पॉवर टीलरसाठी आणि उर्वरित ५० कोटी इतर औजारांच्या अनुदानापोटी मिळण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यान समोर नेहमी खूप मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मजूर वर्ग वेळेवर न मिळणे. म्हणून बैलाएवजी ट्रॅक्टरचलित औजारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळेच गेल्या हंगामात कृषी यांत्रिकीकरणातून विविध औजारांसाठी आलेल्या ६४ हजार अर्जांपैकी १५ हजार अर्ज ट्रॅक्टर अनुदानाचे होते. साडेसात हजार अर्ज पॉवर टिलरचे तर उर्वरित ४२ हजार अर्ज होते.
ट्रॅक्टर अनुदानासाठी यंदा फक्त ७० कोटी रुपये उपलब्ध आहेत. व गेल्या हंगामात २०० कोटी रुपये वाटले गेले होते.. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ट्रॅक्टर अनुदानाची रक्कम आता ५० टक्क्यांपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीपर्यंत अल्प-अत्यल्पभूधारक शेतकऱ्याला मिळणारे ट्रॅक्टर अनुदान आता सव्वा लाख रुपये तर इतरांसाठी एक लाखापर्यंत होते. नव्या निकषानुसार पाच लाखांपर्यंत ट्रॅक्टरला अनुदान मिळणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्याला २६० कोटी रुपये निधी आल्यामुळे ट्रॅक्टरला भरपूर अनुदान वाटता आले. यंदादेखील २०० कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास राज्यात गेल्या वर्षाप्रमाणेच शेतक-यांना अनुदान वाटता येईल, केंद्र व राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरणात केले जाणारे धोरणात्मक बदल छोट्या व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे आहेत.
अश्वशक्तीनुसार असे मिळणार कमाल अनुदान (लाखात)
ट्रक्टर एचपी श्रेणी– विशेष वर्ग– साधारण वर्ग
टूव्हिल ड्राईव्ह ८ ते २० एचपी— २ —१.६०
फोरव्हिल ड्राईव्ह ८ ते २० एचपी— २.२५ —१.८०
टूव्हिल ड्राईव्ह २०ते ४० एचपी—-२.५० —२
फोरव्हिल ड्राईव्ह २०ते ४० एचपी— ३ — २.४०
टूव्हिल ड्राईव्ह ४०ते ७० एचपी—- ४.२५ —३.४०
फोरव्हिल ड्राईव्ह ४०ते ७०एचपी—-५ — ४
संख्या वाढविण्यासाठी अनुदान कमी करण्याचा प्रयत्न
शेतकऱ्यांचा विचार करता केंद्र शासनाने यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी अनुदानाची मर्यादा ४० टक्क्यांवरून ५० तर २५ वरून ३५ टक्के, टक्क्यांपर्यंत नेली आहे. मात्र, त्यामुळे निधी कमी पडण्याची शक्यता आहे. राज्यात ट्रॅक्टर अनुदानासाठी मागणी मोठी असल्यामुळे जास्त अनुदानाचा नियम शिथिल करावा. अनुदान पूर्वीसारखे एक लाखापर्यंत ठेवून जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सूत्र स्वीकारावे, असेदेखील प्रयत्न कृषी खात्याकडून सुरू आहेत.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी जादा अनुदान आता मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!