२७ वर्षीय अंकितीने गाठले यशाचे शिखर

0

जीलिंगो ही दक्षिण-पूर्ण आशियातील प्रसिद्ध फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली कंपनी आहे. अवघ्या ४ वर्षांच्या काळात आपल्या झीलिंगो कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळवण्याच्या अगदी जवळ नेणारी अंकिती बोस ही पहिली भारतीय महिला बनली आहे. विशेष म्हणजे अंकितीचे वय आहे फक्त २७ वर्षे. अंकिती ही या कंपनीची सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहे.

१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल असलेल्या कंपनीलाच यूनिकॉर्नचा दर्जा दिला जातो. अंकितीच्या स्टार्टअपचे मूल्य आहे ९७० मिलियन डॉलर्स. इतके मोठे मूल्य असणाऱ्या कंपनीची अंकिता ही पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी बनली आहे.

झीलिंगो कंपनीचे मुख्यालय सध्या सिंगापूरमध्ये आहे. कंपनीची टेक टीम बंगळुरूमधून काम करते. कंपनीचे दुसरा सहसंस्थापक आयआयटी गुवाहाटीचे विद्यार्थी ध्रुव कपूर (२४) हा आहे. त्यांच्या टीममद्ये सुमारे १०० लोक काम करतात. झीलिंगो ही भारतीय व्यावसायिकांडून चालवली जाणाऱ्या यशस्वी कंपनींपैकी एक बनली आहे. कंपनीने आपल्या मूल्यांपैकी ३०६ मिलियन डॉलर्स केवळ फंडिंगद्वारे जमा केले आहेत.

अशी सूचली कल्पना!

अंकितीने २०१२ मध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे. अर्थशास्त्र आणि गणित हे तिचे विषय होते. अंकीती सांगते की, एकदा ती सुट्टीमध्ये बँकॉकला गेली होती. तिथे लोकांना फॅशनमध्ये किती रस आहे हे जाणवले. यासाठी आपण प्लॅटफॉर्म का तयार करू शकत नाही, असा विचार तिच्या डोक्यात आला. यानंतर तिने सुरू केलेले जीलिंगो हे प्लॅटफॉर्म थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपीन्समध्ये लोकप्रिय झाले.

भारताची निवड का नाही?

२०१४ मध्ये तिची ओळख ध्रुव कपूरशी झाल्यानंतर अंकितीने या व्यावसायाबाबत विचार केला. सुरुवातीला तिने भारताचा विचार केला नाही. याचे कारण म्हणजे भारतात अगोदरच फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारखे ऑनलाइन मार्केटचे मोठे प्लेअर्स कार्यरत होते. दक्षिण पूर्व आशियात अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म नाहीत हे त्यांना अभ्यासाअंती जाणवले. त्यानंतर २०१५ मध्ये जीलिंगो अस्तित्त्वात आले.

या क्षेत्रात महिलांची संख्या खूपच कमी असल्याचे अंकिती सांगते. तिला अनेक पुरुषांचे सहकार्य लाभल्याचेही ती सांगते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.