वादळी पावसाची शक्यता – 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात

0

हवामान अस्थिर होणार असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागातही वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्यासाठी शक्यता आहे.

या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

या हवामानाच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी नियोजन करावे व शेतमाल सुरक्षित ठिकाणी  साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे     झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या दरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.