• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 15, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home यशोगाथा

दोन एकरांतील पेरू बागेने आणली समृद्धी

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
November 28, 2018
in यशोगाथा, बातम्या
0
दोन एकरांतील पेरू बागेने आणली समृद्धी
Share on FacebookShare on WhatsApp

इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर, यश नक्कीच…

“इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर यश मिळण्यास अडचण येत नाही.” निवृत्ती पांडुरंग पवार (केळवद, जि. बुलडाणा) यांच्याबाबत हेच म्हणता येते बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात केळवद येथील पांडुरंग पवार यांची चार एकर शेती   असून त्यांनी चार मुलांना विभाजीत करून दिली आहे. पैकी निवृत्ती हे स्वतःच्या वाट्याला  आलेली एक एकर आणि भावाची एक एकर अशा शेतीची जबाबदारी सांभाळतात.

पेरू झाले मुख्य पीक

पवार यांचे पेरू हे मुख्य पीक आहे. स्वतःचे व भावाचे असे दोन एकर क्षेत्र त्यांनी पेरूला दिले आहे. साधारण १४ वर्षांपूर्वी लागवडीचा श्रीगणेशा केला. लखनऊ ४९, सरदार व जी विलास अशा तीन जाती त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. निवड पद्धतीने काही रोपे विकसित केल्याचा दावाही पवार करतात. हा पेरू आकाराने मोठा असून त्याचा टिकाऊपणा चांगला आहे. बियाही नरम आहेत. त्यामुळे ग्राहकांची त्यास पसंती मिळत असल्याचे ते सांगतात.

पेरूचे व्यवस्थापन

जुन्या बागेत सुमारे २०० झाडे आहेत. ही लागवड २० बाय २० फूट अंतरावरील आहे. जसजसा पेरू शेतीतील आत्मविश्‍वास, कौशल्य वाढत गेले. बाजारपेठेत चांगले नाव मिळवता आले तसतसे पवार यांनी पेरू व्यवस्थापनात सुधारणा सुरू केल्या. आज त्यांच्याकडे १० बाय १० फूट अंतरावरील झाडेही पाहण्यास मिळतात. नवी व जुनी मिळून सुमारे ५२० झाडांचे संगोपन होते. मृग व हस्त असे बहर घेतले जातात. दिवाळीपासून ते फेब्रुवारीपर्यंत विक्रीचा मुख्य हंगाम आटोपतो.

उत्पादन

जुनी झाडे अधिक उत्पादन देतात. सध्या प्रतिझाड १०० ते १२५ किलोपर्यंत उत्पादन मिळते. एका बहरात सुमारे ७०० ते ८०० क्रेट पेरू मिळतात.

पेरूने दिली ओळख; ‘मार्केटिंग’ मध्ये पुढाकार

बुलडाणा जिल्ह्याचे वातावरण पेरूसाठी अत्यंत अनुकूल समजले जाते. त्यातही चिखली तालुका हा प्रामुख्याने पेरूचे माहेरघर झालेला आहे. या जिल्ह्यात उत्पादित होणारा पेरू जिल्ह्याच्या नावाने बाजारपेठांमध्ये विकला जातो. व्यापाऱ्यांना बांधावर माल देण्यापेक्षा विविध बाजारपेठांमध्ये जाऊन मार्केटिंग करण्यावर पवार यांचा भर असतो. स्थानिकमध्ये अकोला व खामगाव या त्यांच्यासाठी हक्काच्या बाजारपेठा आहेतच. मात्र आपल्या दर्जेदार पेरूची नागपूर, सुरत, अहमदाबाद आदी बाजारपेठांतही त्यांनी ओळख तयार केली आहे. पेरूचा एकसारखा आकार, चमक, गोडी यात त्यांनी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नोटाबंदी होण्यापूर्वी दर चांगले मिळायचे. पण आता ते किलोला २० ते २५ रुपयांपर्यंत मिळतात. कमाल दर सुरत येथे किलोला ५५ रुपयांपर्यंत मिळवल्याचे त्यांनी सांगितले. सर्व खर्च जाऊन एकरी ७५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो असे ते सांगतात.

सेंद्रिय पद्धतीवर भर :

बागेचे व्यवस्थापन करताना प्रामुख्याने सेंद्रीय, जैविक निविष्ठांचा वापर करण्यावर भर असतो. शेतातील काडी कचरा, गवत कुजवून त्याचे खत झाडांना दिले जाते. निंबोळी पेंड विकत घेतली जाते. साधारण प्रतिझाड दोन किलो याप्रमाणे त्याचा वापर होतो. साधारणतः १५ मे दरम्यान छाटणी केली जाते. त्यानंतर जुन्या झाडांना प्रतिझाड ३० किलो शेणखत तर नव्या झाडाला १५ किलोपर्यंत शेणखत दिले जाते. ते शेजारील शेतकऱ्याकडून विकत घेण्यात येते. रोगांना प्रतिबंध म्हणून बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. दर १५ दिवसांतून दोन वेळा जीवामृत देण्यात येते. सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी झालाच शिवाय फळांची प्रतही सुधारली असे पवार यांनी सांगितले.

मुलांना उच्च शिक्षण दिले :

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले निवृत्ती यांना काही कारणांमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र आपली मुले शिक्षणात मागे राहू नयेत अशी पवार यांची तीव्र इच्छा होती. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मोठ्या मुलीने बीएस्सी व डीएमएलटीचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरी मुलगी ‘बीएसएस्सी मायक्रो बॉयोलॉजी’ चे शिक्षण घेत आहे. मुलगा बारावीला असून विज्ञान हा त्याचा विषय आहे.

पूरक व्यवसायाची जोड :

पेरू बागेत आंतरपिके घेण्याचा प्रयत्न असतो. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो. शेतीला उत्पन्नाची जोड म्हणून मिनी डाळमील व्यवसायही पवार चालवतात. त्याद्वारे तूर, उडीद, मूग, हरभरा डाळी बनवून देण्याचे काम ते करतात.

अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन :

चिकित्सक बुद्धी व अभ्यासूवृत्ती यातून पवार यांनी पेरू शेतीत हातखंडा मिळवला. छाटणी तंत्र, लागवड अंतर, फूलगळ, कीड नियंत्रण आदी विविध बाबींसंदर्भात त्यांचा १४ वर्षांचा मोठा अनुभव तयार झाल्याने पेरूतील ते जणू मास्टरच झाले आहेत. या भागात नव्याने पेरू लागवड करणारे किंवा जुन्या बागांमध्येही काहीही समस्या असेल तर पवार त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेतून परिसरात सुमारे १२ ते १५ एकरांपर्यंत पेरूची लागवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना रोपनिर्मितीपासून सर्व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाते.

निवृत्ती पवार, 9765687690

 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

 

https://whatsapp.heeraagro.com

 

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Tags: Read more about the prosperity brought by the garden of two acres of Peruअधिक वाचा दोन एकरांतील पेरू बागेने आणली समृद्धी
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In