फंडा थंडे थंडे कूल का

1

उन्हाळा खूप जाणवत असल्यामुळे आपल्या शरीराला थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. त्यात शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार आलाच. आपल्या देशातच आधीपासून चालत आलेले काही पदार्थ आहेतच जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत करतील. त्यांची माहिती खालीलप्रमाणे-

दही-
या दिवसात बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास न होण्यासाठी दही खान हे कधीही उत्तम.
अर्थात हे दही घरी लावलेलं असावं. जेवणात दही लोबत भाताचासमावेश असणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
गुलकंद-
उन्हाळ्यातील आणखी एक अप्रतिम पदार्थ म्हणजे गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारे गुलकंद. सकाळी उठल्यावर एक चमचा अथवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास या दिवसात फायदेशीर ठरतं. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही चेहऱ्यावरची तकाकी तशीच ठेवण्याचं काम गुलकंद करतो.
सब्जा-
तत्काळ थंडावा मिळण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे. ग्लासभर पाण्यात भिजवलेला सब्जा घालून ते पाणी पिणं अतिशय उपयोगी ठरत. आधीपासूनच भारतातील अनेक घरांमध्ये फालुदा, ताक, खीर अशा पदार्थांमध्ये सब्जा आवर्जून घातला जातो.
आंबा-
अनेकांना ठाऊक नसलेली आणखी एक गोष्ट अशी,उन्हाळ्यामध्ये आंबा खूप गुणकारी ठरतो.आंबा जसा चवीला चांगला तसाच संपूर्ण शरीरयंत्रणेत लगेच सुसूत्रता आणून देण्यासाठीही आंबा मदत करतो. तसेच आंबा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजवून ठेवावा.
नारळ पाणी-
नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे काम बजावत असतेसतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय होय. सोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी त्वचेला तजेलदार ठेवण्यास अतिशय फायद्याचं आहे.
जिरे-
मसाल्याच्या पदार्थांमधील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरे. या मसाल्याच्या पदार्थांमधील घटकाचा, उन्हाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या गुणांबद्दल अनेकांना माहीत नसतं. जिऱ्याचा सेवनाने साध्य होणाऱ्या गोष्टींमध्ये मेद कमी करण्यास मदत करणं, नसांना आराम देणं या गोष्टी येतात.भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळाल्याचं तुम्हाला सहज जाणवेल.
माठातलं पाणी-
मडक्याच्या तळाशी खसचा पाला टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा.एक मातीचा माठ, एक मलमलचं कापड आणि खसचा पाला यापासून तुम्ही थंडावा मिळेल असं पेय तयार करू शकता. सच्छिद्र माठ आणि खस खस मुळे शरीराला थंडावा मिळतो
काजुगर-
रसाळ फळ म्हणजे संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असलेले काजूगर फॅट्स कमी करण्यासाठी फायद्याचं आहे. हे रसाळ फळ उन्हाळ्यात खाणं नक्कीच फायदेशीर आहे
ज्वारी-
व्हिटॅमिन बी१, लोह आणि फायबर यांचं भरपूर प्रमाण असलेली व शरीराला आवश्यक असलेला थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता ज्वारीत आहे.
बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित राखण्यास नक्कीच मदत होईल.
कोकम सरबत-
तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म असलेलं कोकम लठ्ठपणावर मात करायला मदत करतं. या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारं कोकम सरबत, कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासही मदत करत असल्याने ते अवश्य प्याव.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] फंडा थंडे थंडे कूल का […]

Leave A Reply

Your email address will not be published.