भोकरदन/प्रतिनिधी
शेतकर्याची फसवणूक करणारा आरोपी कैलास ज्ञानदेव गाढवे (24) रा. मासरूळ ता. जि. बुलढाणा यास भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकरी नानासाहेब देठे रा. तळणी ता. भोकरदन यांचा कापूस जास्त भावाने गुप्तेश्वर जिनिंग येथे विकून देतो असे सांगून सदर कापूस विकून 67000 रूपयांची फसवणूक आरोपीने केली होती. आपण कापूस दलाल आहे असे सांगून आरोपीने कापूस विकून तो पळून गेला होता. पोलिसांच्या शोध पथकाने आरोपीस औरंगाबाद वाळूज एमआयडीसी येथून दि. 22 रोजी पकडले. आरोपीस अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आला आहे. पुढील कतपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जी. यू. गायकवाड, पोना संदीप उगले, पोक विजय जाधव हे करत आहेत.