शेतकर्‍यांच्या अस्थी मुख्यमंत्र्यांना पाठवल्या

0

उस्मानाबाद/प्रतिनिधी
आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या अस्थी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्या आहेत. एकाच गावातील दोन शेतकर्‍यांनी कर्जबाजारी आणि नापिकीमुळे गळफास घेवून आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे सरकारचा निषेध करत मनसेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शेतकर्‍यांच्या अस्थी मुख्यमंत्र्यांना पाठवल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच तावरजखेडा या एकाच गावातील शिवाजी जनार्धन सगर आणि श्रीपती गंपू फेरे यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. राज्य सरकार नुसत्या मोठमोठ्या घोषणा करतय. शेतकर्‍यांच्या पदरात मात्र काहीच पडत नाही. कर्जमाफी ही धूळफेक आहे. या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना सरकारने तत्काळ मदत करावी, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची एवढी मोठी घटना घडूनही शासनाच्या एकाही प्रतिनिधीने गावाला भेट दिली नाही. या असंवेदनशीलतेचा निषेध करत आज मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या अस्थी एकत्र करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवल्या आहेत.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.