पिंपळगाव पेठ परिसरातील डाळिंब पिकाचे अस्तित्व धोक्यात विहिरीणी गाठला तळ, परीसरातील शेतकरी चिंताग्रस्त

0

पिंपळगाव पेठ परिसरातील डाळिंब पिकाचे अस्तित्व धोक्यात
विहिरीणी गाठला तळ, परीसरातील शेतकरी चिंताग्रस्त
औरंगाबाद
सुर्य आग ओकत असल्याने सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ परिसरातील पाण्याअभावी डाळीबांच्या बागा सुकु लागल्या असून विहिरीणीहि तळ गाठला आहे शेतकर्‍यांनी बांधलेली शेततळी कधीच कोरडी पडली आहेत.तर विहिरी व बोअरवेलन्सनी तळ गाठला आहे. त्यामुळे पळबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यानी लाखो रुपये खर्चून टँकरने पाण्याची व्यवस्था केली होती मात्र, या वर्षी पाणिच उपलब्ध नसल्याने टंकरदवारे पाणि आणायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे दिवसेंदिवस खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पिंपळगाव पेठ येथील शेतकरी दादाराव सांडु गुजांळ या शेतकर्‍याने गट नं 239 मध्ये अडिच हेकटरवरती पारंपारीक पिकाला फाटा देऊन फळबाग लागवड केली आहे डाळिंब 500 झाडे, पेरु चि 50 झाडे लावलेली असुन पाण्याअभावी डाळिंब व पेरु पिकाचे असतित्व धोक्यात आल्याचे चित्र
परीसरात दिसुन येत आहे

मात्र या वर्षी तापमानाने उचांक गाठल्याने व दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे बागासाठी ठिंबक सिंचनाची व्यवस्था असली तरी पाणीच उपलब्ध नाही. आतापर्यत टँकरद्वारा पाण्यासाठी मोठा खर्च शेतकर्‍यांनी केला आहे उन्हाळ्यात कांदा,मिरची,हि पिके मोठ्या प्रमाणावर घेतलि जातात
कधि न आटणार्या विहिरीणीहि या वर्षी तळ गाठला आहे या वर्षी शेतकर्याना शेतात काम करण्याची घरीवुनच पाणि घेऊन जावे लागत आहे शासनाने डाळिंबाला रोगापासून बचाव करण्यासाठी प्रभावी औषधांचे संशोधन व विशेष अनुदान देण्याची मागणीही डाळिंब फळबाग लागवडधारक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगंती पायपीट करावी लागत आहे. जे काही पाणी उपलब्ध होते ते पाणी प्लॅस्टीकच्या टाकीमध्ये साठवून त्याला कुलपे लावल्याचि चित्र परिसरात दिसुन येत आहे. माणसं पाणी मिळवतात पण मुक्या जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. गुरांना पाणी व चारा मिळत नसल्याने शेतकर्यांनी गुरे विक्रीचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे.

फळबाग उत्पादक हवालदिल
मागील पाच वर्षांत पाण्याअभावी डाळिंब, चिकू, मोसंबीच्या बागा जळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी हिरव्यागार दिसणार्‍या बागा आता पाण्याअभावी जळताना पाहून शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. हजारो शेतकरी फळबागा जगविण्यासाठी मोठा खर्च करीत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसुन येत आहे.

शेततळी रिकामीच…….
यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. ओढे, नाले न वाहिल्याने विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याची सुविधा निर्माण केलेली आहे. परंतु या शेततळ्यातील पाणीदेखील कमी पडू शकते. पावसाळ्याला अजून सहा ते सात महिने कालावधी असून, तोपर्यंत फळबाग जगविणे जिकिरीचे होणार आहे

शासनाकडून मदत व्हावी……
आठ वर्षांपासुन डाळिंब (500)व पेरू(50) पिकाचे ठिबंकच्या साहयाणे उत्पन्न घेत होतो मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्याने भुजल पातळी वाढली नसल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे सीताफळ, पेरु, डाळिंब पिकांना टँकरद्वारे पाणी द्यायचे म्हणले, तरी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे तरी आम्हाला शासनाकडून थोड्याफार प्रमाणात मदत झाली पाहिजे.

-दादाराव गुजांळ (शेतकरी)

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.