पीककर्जासाठी उपोषणास बसलेल्या युवकाचा अंत

0

पाथरी/प्रतिनिधी
पाथरी येथील स्टेट बँक ऑफ है.बाद समोर पीककर्जा साठी व मूद्रा लोणसाठी उपोषणास दि.12/12/2018 रोजी करत असताना मर्डसगाव येथील तुकाराम वैजनाथ काळे वय 35 या युवकाच अमरण उपोषण दरम्यान छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

तुकाराम वैजनाथ काळे यांच्या सह अनेक जणांची खाते माफीत आले असून सूध्दा सदरील बँक चे शाखा व्यवस्थापक यांनी माफीत आलेल्या शेतक-यांना नविन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत होती या बाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने 3/12 रोजी निवेदना द्वारे ईशारा दिला होता मात्र बँकेने या कडे दुर्लक्ष केल्याने या पक्षाच्या वतीने दि 12/12 रोजी अमरण उपोषणास बसले असताना तुकाराम काळे या उपोषणार्थ्याच्या छातीत कळ आल्याने इतर उपोषण कर्ता यांनी त्यास प्राथमिक उपचार साठी पाथरी येथील वरद हाँस्पिटल येथे नेउन पूढील उपचारासाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आसता तेथे उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आसून त्याच्या पाश्चात पत्नी एक मूलगा मुलगी व दोन भाऊ आहेत

चौकट
पाथरी तालुक्यात भिषन दुष्काळ पडला असून पाथरी तालूका दुष्काळ ग्रस्त जाहिर केला आसतानाही राष्ट्रीय कृत बँका शेतक-यांना पिक कर्ज देण्यास विनाकारण त्रास देत आहेत त्याच बरोबर सुशिक्षीत बेरोजगारांना मुद्रालोण व विविध कर्ज देण्यास नकार देत आहेत,या मुळे यांच्या वर उपासमारीची वेळ येत आहे.

जिल्हा अधिकारी यांचे असून सुद्धा बँक कर्मचारी व शाखा व्यवस्थापक कर्ज माफ झालेल्या कर्ज वाटपा पासुन वंचित ठेवत आहे त्वरीत उर्वरित शेतक-यांना विना अट कर्ज वाटप करावे अन्यथा आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभाचे जिल्हा सचिव दिपक लिपने यांनी दैनिक आदर्श गावकरी शी बोलत होते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.