सोळाशे रूपयांच्या पगाराने दाखवली दिशा

0

कृषीमित्रांनी साधला उन्नतीचा मार्ग सेलू
कष्टाचे फळ उशीरा का? होईना मिळते यांची प्रत्यक्ष अनुभुती आली ती कृषीविषयात पदवीधारक असलेले हरिराम बालासाहेब कव्हळे यांना.सेलु येथे राहणारे तसेच मितभाषी असलेले हरिराम कव्हळे. यांचे वडिल बालासाहेब कव्हळे यांना राजकारणाची आवड. त्यामुळे हरिराम कव्हळे यांना सुरवातीपासूनच स्वत: चे निर्णय घेण्याची परवानगी. घरची आर्थीक परिस्थिती प्रतिकुलच. त्यामध्ये कव्हळे यांनी वसंतराव चव्हाण कृषी विद्यापिठ परभणी येथे प्रवेश घेतला. तो बी. एस्सी. ऊतीसंवर्धन शास्र प्रथम वर्षात सन 2005 ते 2006 या दरम्यान. महाविद्यालयात शिक्षण घेत त्यांनी बियाणे व रसायने कंपन्यामध्ये मार्केटिंग अधिकारी म्हणुन नौकरी करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये परभणी येथे राहणे तसेच खानावळीत खाण्याचा खर्च भागविण्यास मदत होत होती. त्यांनी 1600 रुपये एवढ्या तुटपुज्यां पगारावर आपल्या नौकरीची सुरुवात केली. कारण केवळ शिक्षण करणे शक्य नव्हते परिस्थिती बिकट घरुन खर्च करण्यास पैसे मिळत नव्हते.मात्र शिक्षणासोबतच बियाणे कंपन्यासह रसायने कंपन्यात काम केले. असे करत असतांना त्यांना शेतक-या बद्दल अस्था वाटत असे कारण शेतक-यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते असे होतांना दिसत नसे त्यामुळे त्यांनी कंपनी च्या मार्केटिंग सोबत शेतक-यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करणे सुरु केले यामुळे शेतक-यांना फायदा होत होता. त्यानंतर सन 2010 मध्ये ते काम करत असलेली कंपनी विभा ग्रुपला उतरती कळा लागली ती झळ कव्हऴे यांनी ही बसली कारण हातचे काम गेले कंपनी बंद झाली. पगार मिळाले नाहीत. तब्बल सहा महिने कुठेही काम मिळाले नसल्याने हताश होण्याची वेळ आली. मात्र खचुन न जात त्यांनी कृषी मित्र नावाच्या सोशल मीडियावर ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपच्या माध्यमातुन त्यांनी शेतक-यांना थेट बांधावर जावुन समुपदेशन व मार्गदर्शन करणे सुरु केले यामध्ये त्यांनी केळी, हळद, पपई, भाजीपाला पिके, कापुस ,सोयाबीन, तुर अशा अन्य पिकांचे प्लँट तयार करुन त्यापद्धतीने त्यांच्यावर औषधी फवारणी कशी करावी उत्पन्न कसे वाढेल याची प्रात्याक्षिके थेट शेतात जावुन दाखवील शेतक-यांना यामाध्यातुन विक्रमी पिकांचे उत्पन्न झाले. कव्हळे यांनी कमी खर्चातील औषधातुन जास्त उत्पन्न मिळवता येते हा प्रयोग शेतक-यांना करुन दाखवला. शेतक-यांकडुन कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता हे मार्गदर्शन त्यांनी सुरु ठेवले. कंपनीचा पगार जेवढा वाचवता येईल तेवढा पगार वाचवुन त्यांनी भांडवल उभारणी केली. त्या तुटपुंज्या भांडवलातुन त्यांनी कृषी मित्र ग्रुपच्या नावाने कृषी मित्र ट्रेडीग कंपनीची सुरुवात केली. कृषी केंद्र सुरु केले मात्र आडचण होती ती बि बियाणे ,औषधी विक्री करण्याचे. या सर्वात त्यांना फायदा झाला तो त्यांनी शेतक-यांना वेळोवेळी बांधावर जावुन केलेल्या मोफत सल्ला व मार्गदर्शनाचा. त्यांनी मे 2018 मध्ये सुरु केलेल्या कृषी केंद्रात तब्बल 2 हजार कपासी बियाणे बँगांची विक्री 14 दिवसात झाली जी की नविन कृषी केंद्र चालकासाठी तब्बल चार वर्ष लागणारा कालावधी असतो मात्र कव्हऴे यांनी केलेल्या मेहनतीचे चिझ या मुळे दिसुन आले. त्यानंतर त्यांच्याकडे औषधी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असुन त्यांमुळे वर्षभरात 30 ते 40 लाखाची दुकानाची उलाढाल होईल अशी अपेक्षा कव्हळे यांना असुन त्यांनी सांगितले की कष्टांचे फळ एक ना एक दिवस मिळत असते त्यामुळे तरुणांनी कष्ट करावे यामुळे निश्चित तुमची उन्नती होईल. व यापुढे ही कृषी केंद्र चालवत असतांना शेतक-यांना योग्य सल्ला व कमी दरातील चांगल्या निकाल येणारी औषधी विक्री करण्याचा मानस असुन शेतकरी या देशाचा आर्थीक कणा आहे व तो मजबुत झाला पाहिजे.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave A Reply

Your email address will not be published.