भारतातील खूप फायदेशीर जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय

0

अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगार युवक यांच्यासाठी रोजगाराची उत्कृष्ट संधी आणि भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी महत्वाचा स्त्रोत म्हणजे दुग्धव्यवसाय होय. भारत हा जगातील सर्वाधिक दुधउत्पादक देश आहे. पण त्याचबरोबर दुध आणि दुधापासून बनणारे पदार्थ यांची मागणीही दिवसेंदिवस वाढतेच आहे. यामुळे या व्यवसायाला भविष्यात प्रचंड वाव आहे. म्हणून दुधदुभत्या जनावरांना आवश्यक असणाऱ्या कुरणाची लागवड केली तर बराच अतिरिक्त खर्च वाचू शकेल.

भारतात दुग्धव्यवसाय म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असल्याची बरीच कारणे आहेत. हा व्यवसाय पर्यावरणास अनुकूल आहे कारण यामुळे अजिबात प्रदूषण होत नाही. कुशल मनुष्यबळ तेवढे आवश्यक नाही. जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. महापूर, चक्रीवादळ अशा आपत्तींमध्ये व्यवसायाचे ठिकाण बदलता येऊ शकते.

  • हा व्यवसाय कसा सुरु करावा-

१. व्यवसायासंबंधी प्राथमिक माहिती गोळा करावी. आपली उत्पादन उद्दिष्टे ठरवावीत.

२. व्यावसायिक स्तरावर चालवल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायाला भेट देऊ शकता आणि त्याच्या संचालकांशी चर्चा करू शकता.

३. स्वतःच धंद्याचे व्यवस्थापन करू इच्छित असाल तर सहा महिने एखाद्या ठिकाणी अनुभव घ्यावा.

४. तुमच्या भागात चारा आणि वैरणाची बाजारपेठ असेल तर त्याचा अभ्यास करावा.

५. थोडयाफार अनुभवी आणि कष्टाळू मजुरांची टीम तयार करावी. विशिष्ट कामे नेमून देण्यासाठी तुम्ही त्यांना प्रशिक्षणही देऊ शकता.

६. ‘कृषीसम्राट’सारख्या वेबसाईटला सातत्याने भेट द्यावी व आपली माहिती अद्ययावत ठेवावी.

७. कधीकधी जनावर खरेदी-विक्री बाजाराला भेट द्यावी. तेथील व्यापाऱ्यांच्या संपर्कात राहावे.

  • दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी प्राथमिक व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याच्या संधी-

१. विविध राज्यांतील कृषी/ पशुवैद्यकीय विद्यापीठे

२. कृषी विज्ञान केंद्र

३. राज्य पशुसंवर्धन विभाग

४. राज्य ग्रामीण विकास संस्था

दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आणि दुध देणाऱ्या प्राण्यांचे संगोपन याच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची चौकशीही करू शकता, उदा. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था (NDRI), कर्नाल, हरियाणा

याशिवाय, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या बिगरसरकारी संस्थांकडून तुम्ही प्रशिक्षण सोयी उपलब्ध करून घेऊ शकता.

  • दुग्धव्यवसायासाठी कोणत्या जनावराची निवड करावी?

१. गाय-

बाजारात चांगल्या दर्जाच्या गायी मिळतात. रू. १५०० ते रू. २००० प्रति लिटर दुधाचे उत्पादन प्रति दिवस या भावाने गायींची खरेदी होते. म्हणजे उदाहरणार्थ, एखादी गाय दिवसाला १० लिटर दुध देत असेल तर तिची किंमत रू. १५००० ते रू. २०००० एवढी असेल.

योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक १३-१४ महिन्यांनी गाय वासराला जन्म देते.

गाय गरीब असते आणि तिला हाताळणे सोपे असते.

हॉलस्टीन आणि जर्सी या संकरीत जातींच्या गायींनी भारतीय हवामानाशी चांगलं अनुकूलन साधलंय. त्यांचं दुध उत्पादन जास्त आहे.

गायीच्या दुधात मेदाचे प्रमाण ३% ते ५.५% असते. परंतु, म्हशीच्या पेक्षा कमी असते.

२. म्हैस-

भारतात मुर्रा, मेहसाणा यासारख्या म्हशीच्या उत्तम जाती आहेत, ज्या यावसायिक दुग्धपालनासाठी उपयुक्त आहेत.

म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा मेदाचे प्रमाण जास्त असल्याने लोणी व तूप बनवण्यासाठी या दुधाला बाजारात जास्त मागणी असते. पाहुण्यांच्या स्वागताचे पेय म्हणून म्हशीच्या दुधाचा घरगुती वापर होतो.

तंतुमय पिकांच्या अवशेषांवर म्हशींचे पालनपोषण होऊ शकते. यामुळे आहारावरील खर्च कमी होतो.

म्हशी उशिरा परिपक्व होतात आणि १६ ते १८ महिन्यांच्या अंतराने वासरांना जन्म देतात.

  • दुग्धव्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ: एक दृष्टीक्षेप

१. ४० स्क्वे.फु. जागा + छत, ८० स्क्वे. फु. मोकळी जागा प्रत्येक जनावरासाठी

२. अवजारे ठेवण्यासाठी १० x १०ची खोली

३. दुध साठवण्यासाठी १० x १२ची खोली

४. योग्य आकाराचे कार्यालय आणि दिवाणखाना

५. किमान २००० लिटर पाणी साठवू शकेल अशी टाकी

६. पाण्याची टाकी १ तासात भरू शकेल इतक्या क्षमतेचे बोअरवेल

७. प्रत्येकी १० जनावरांसाठी १ मजूर या हिशोबाने तुम्ही मनुष्यबळ उपलब्ध करू शकता.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.