डाळिंब बागायतदारांमध्ये सध्या जाणवत असलेले प्रॉब्लेम म्हणजे-
– थंडीतील
डाळिंबाची क्रॅकिंग
– थंडीतील कमी
फुले
– थंडीत बागेची
घ्यावयाची काळजी
प्रथमतः बागेत
सध्या वरील तिन्ही प्रॉब्लेम जाणवण्याला खालील घटक कारणीभूत आहेत हे आपण लक्षात
घ्यावे
फळाचा आकार – फळे फुगवणीच्या कालावधीत मोठ्या फळांची क्रॅकिंग जास्त प्रमाणात होते. फळे जेवढी मोठी(जी फळे काढणीस आलेली आहेत) ती क्रॅकिंग जाण्याचे प्रमाण अधिक असते
सूर्यप्रकाश – सूर्यप्रकाशाच्या कक्षेतील फळे हे कमी प्रमाणात तडकतात याउलट जी फळे झाकलेली असतात ती जास्त प्रमाणात तडकतात. त्यामुळे बाग जास्तपण गच्च राहणार नाही याची काळजी घ्या
तापमान –
सलग सारखे तापमान राहिले तर फळांना काही फरक होत नाही परंतु तापमान मोठ्या
प्रमाणात कमी जास्त होत असेल तर फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
कधी कधी दिवसा
मोठ्या प्रमाणात उष्णता व रात्री अधिक थन्डी याने फळे तडकतात
आर्द्रता – कमी जास्त प्रमाणात हवेत आर्द्रता राहिली तरी फळे/फुले गळण्याचे प्रमाण तसेच फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन- बागेला जर ड्रीपने योग्य पद्धतीत खते व अन्य अन्नद्रवे, सूक्ष्म अन्नद्रवे बागेला दिलेली नसतील तरी फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
फळ तडकण्यावर/थंडीत फुले कमी प्रमाणात निघण्यावर खालील उपाय करावे.
– बागेचे तापमान योग्य प्रमाणात राहील यावर भर द्यावा त्यासाठी
– पाणी व्यवस्थापन योग्य करावे.
– अतिरिक्त थंडी असेल तर बागेत 2-3 ठिकाणी शेकोटी करून बागेतील तापमान वाढेल असे पाहावे
–
खतांच्या
बाबतीत आपल्या बागेला,
झिंक(zn), कॅल्शिअम(ca), बोरॉन(bo), व पोटॅश(k) या अन्नद्रव्यांची कमी येणार नाही याकडे लक्ष द्या.
त्यासाठी
बागेला,
– बागेला
कॅल्शिअम अधिक बोरॉन फवारणी व ड्रिपमधून पण द्या.
– फळ तडकते व पानांच्या कडा जळत असतील तर बागेला एक दोन वेळा 00/00/50-4 किलो प्रति एकर ड्रीपने द्या व त्याआधी 00/00/50-3 ग्राम प्रति लिटर + चिलेटेड झिंक 1 ग्राम प्रति लिटर ची फवारणी 1-2 वेळेस घ्या
– फळे तडकते असे वाटत असेल तर बागेला फॉस्फोरोस युक्त खते जसे कि 12/61/00, 13/40/13, 00/52/34 देणे काही दिवस थांबवा.
– वातावरण साफ झाले कि तापमान वाढल्यानंतर आपले खतांचे शेड्युल परत चालू केले तरी चालेल.
– तापमान वाढल्यांनंतर जर फळफुगवण किंवा फुलांची संख्या कमी वाटत असेल तर पोषक औषधे- अनारकिंग नवसंजीवनी सोडले तरी चालेल.
– महाराष्ट्राच्या सर्वच भागात सध्या थंडीची लाट आहेच..त्यामुळे वर सांगितलेल्या उपाययोजना ज्या भागात अधिक प्रमाणात थंडी आहे किंवा जिथे फळे तडकते आहे त्या सर्वानी केल्या तरी चालतील
– ज्या ठिकाणी तापमान उष्ण आहे व फळ तडकणे वैगरे समस्या जाणवत नसतील त्यांनी त्यांचे खतांचे वेळापत्रक आहे तसे चालू ठेवले तरी काही हरकत नाही.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.