परिचय
चिंचेच्या गरामध्ये औषधी गुणधर्मांबरोबरच आहार देखील चांगले असते. भारतीय जेवणामध्ये काहीसा चिंचेच्या गराचा देखील वापर केला जातो. चिंच पावडरचा बेकरी व कन्फेक्शरी पदार्थांमध्ये फार जास्त प्रमाणात वापर केला जातो. भारतामध्ये विदेशात चिंचगर, पावडरला जास्तच मागणी आहे. चिंचेचा हंगाम मार्च ते एप्रिल महिन्यां दरम्यान येतो. पिकलेल्या फळामध्ये गराचे प्रमाण 35 ते 60 टक्के, इतके असते, बियांचे प्रमाण 12 ते 43 टक्के, शिरांचे प्रमाण एक ते पाच टक्के व टरफलांचे प्रमाण 7 ते 15 टक्के असते. चिंचेच बनविलेले सरबत उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. चिंचेचा उपयोग जुलाब कमी करण्यासाठी होतो. चिंचेचा गर जास्त जुना, तेवढे त्याचे औषधी गुण जास्त असतो. चिंचेची चटणी, सार, आमटी, वरण, सॉस इत्यादी तयार करताना चिंचेच्या गराचा वापर नेहमी केला जातो. भारताबरोबरच इतर देशांमध्ये देखील जास्त प्रमाणात मागणी आहे.
चिंच लागवड :
चिंचेची लागवड हलक्या जमिनीवर व मध्यम-खोल जमिनीत करावी.
चिंचलागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर खड्डे करून1 मी. X 1 मी. X 1 मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये पालापाचोळा, कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने मोठा खड्डा भरून घ्यावा.
लागवडीसाठी अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या जाती. लागवडीनंतर कलमांची जतन करावी.
चिंचेचे औषधी गुणधर्म
कांचनाथ जातीचा चिंचवृक्ष हा मूळ दक्षिण आफ्रिकेतला आहे, अशी काल्पनिक कथा आहे अति प्राचिन काळापासून भारताच्या जमीनीत आहे. त्याच्या भारतात एकूण 24 उपजाती आहेत. आपल्याकडं हिरवी चिंच व लाल चिंच अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. गुजरात राज्यात लाल चिंचाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. ब्रम्हसंहिता या अतीप्राचीन या ग्रंथात चिंचेचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. चिंचफळातला गर रोचक, दाहशामक व रक्तपित्तशामक असतो. लघवीच्या आजरावर चिंचेच्या टरफलांची राख देतात. फुले चिंचपन्हे पित्त व इतर होणाऱ्या तापावर व जुलाबावर देतात.
लचक-मुरगळ, व्रण बरा होण्यासाठी त्यावर चिंचपाला ठेचून लावतात. चिंचपाला सारक, रूचकर असतो. त्यात टार्टिरिक अॅसिड औषधी गुणधर्म असतो. पाळीव जनावरांची पचनक्रिया बिघडली असता त्यास चिंचपाला व लिंबपाला मिश्रण करून चारा खाऊ घालतात. पाल्याच्या रसात तुरटी उगाळून त्यात कापडाची पट्टी भिजवून डोळयावर बांधल्यास डोळ्याचा आजार बरा होतो. चिंचेच्या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर खूप चवदार लागते. चटणीत चवीला थोडागुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकावी.
जेवनानंतर मुखशुध्दीसाठी चिंचोका घ्यावीत. भाजलेल्या चिचोका साल काढून सुपारीसारखे चुर्ण किंवा तुकडे, भाजलेल्या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबु ओवा टाकावा. ही सुपारी चवदार व पाचक बनते.
चिंचोके वातहरक, रक्तदोपडजीभ आल्यास चिंचोका थंड पाण्यात उगाळून त्याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंडपाण्यात मिसळून घेतल्यास गोवर व कांजिण्यात आराम पडतो. चिंचोके कुटून व यंत्रदाबानं चिंचोक्याचं तेल काढतात. ते शक्तीवर्धक असतं. चिंचपाला, चिंचफळ, चिंचोके व चिंचसाल यांचे अनेक औषधी उपयोग होतात.
जमिनीचे रक्षण
चिंचवृक्षाची मुळे ९ ते १२ मीटर खोलवरजातात. जमिनीवरील माती पावसाच्या पाण्याने वाहू न जाता धरून ठेवण्याचे कार्य चिंचमुळे करीत राहते. चिंचेच्या झाडाखाली दुसरा कोणताही झाड सहज सहजी वाढत नाही. कारण झाडाखाली दाट सावली असते. सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही. तसेच चिंचेच्या रासायनिक, आम्लधर्मीय गुणधर्मामुळे चिंचेखाली इतर झाडे वाढत नाहीत. चिंचेची झाडे पक्ष्यांचे मोठे आश्रयस्थान आहेत.
कावळे, बगळे, चिमणी इत्यादी पक्षी चिंचेच्या झाडावर घरटी बांधतात. बगळ्यांची मोठ मोठी घर विशाल चिंचेच्या झाडावर असते. या वसाहतीला सारंगगार म्हणतात. चिंचेच्या फांद्या लवचिक असतात. वादळवाऱ्याने त्या तुटत नाहीत. पक्ष्यांची घरटी देखील खाली पडत नाहीत.
चिंचेच्या फांद्यांचा गच्च झाडावर असतो. त्यामुळे झाडांवर चढणारे शिकारी प्राणी व साप सरपटणारेयांना पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत पोहचता येत नाही. पक्ष्यांची अंडी व पिले सुरक्षित राहतात. म्हणून बगळे, करकोचे, पाणकावळे हे पक्षी प्रजोत्पादनासाठी घरटी बांधण्यास चिंचेचे झाडं पसंद करतात. चिंचेच्या फुलांकडे मधमाश्या ओढावतातत्यापासून उत्तम असे मध गोळा होते. चिंचवृक्ष बारमाही बहारलेले असते म्हणून रस्त्याच्या कडेने सावलीसाठी व शोभेसाठी चिंचेची झाडे लावतात. आजही रस्त्याच्या कडेने चिंचेची झाडे लावलेली आहेत.
चिंचेच्या जाती
चिंचेची लागवड मुरमाड, हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीवर पहावयास मिळते, मध्यम – खोल जमिनीत करावी. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 मी. X 1 मी. X 1 मी. आकाराचे मोठेखड्डे खणून त्यामध्ये आतील भागात पालापाचोळा, कुजलेले शेणखत, व काहीसे सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून टाकावा.
पहिला चिंच महोत्सव
औरंगाबादमध्ये कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस चिंच महोत्सवाला सुरुवात झाली.
दिनांक 05 आणि 06 मार्च 2008 सुरुवात झाली.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.