आ. जयदत्त क्षीरसागर
बीड / प्रतिनिधी
शेतकर्यांना सक्षम करून त्यांना अर्थिकदृष्टया सक्षम होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) राबविण्यात येत असून मराठवाड्यातून आठ जिल्ह्याची निवड करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकर्यांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. बीड मतदार संघातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्यासाठी आ. क्षीरसागर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाच्या वतीने शेतकर्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत राज्यातील पंधरा जिल्हे दुष्काळ आणि नापिकी लक्षात घेता समाविष्ठ करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील 391 गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून बीड मतदार संघातील 54 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सलग समतल चर, बांध बंदिस्ती, माती नाला, सिंमेट नाला, शेततळे, विहीर पुनर्भरण, जलसाठ्यातील गाळ काढणे, ठिंबक किंवा तुषार सिंचन, फळबाग लागवड यासह नाविण्यपूर्ण योजना शेतकर्यांसाठी मिळणार आहेत. या प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षे असून यासाठी राज्य शासनाने 4000 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असून लहान लहान शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, या योजनेअंतर्गत बीड मतदार संघातील अधिकाधिक गावांचा समावेश व्हावा त्यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या योजनेमुळे शेतकर्याला लाभ होणार आहे.