आपल्या शेतातल्या मातीमध्ये खत घालण्याची गरज आहे का`?
हे पाहण्याकरिता मातीचा कस तपासण्याच्या काही साध्या,व सोप्या सहज करता येतील. अशा काही पद्धती खाली दिल्या आहेत.
मातीचा एक मूलभूत गुणविशेष म्हणजे मातीची घडण सर्वसाधारणपणे, मातीचे वर्गीकरण चिकण माती, रेताड माती किंवा मिश्र माती (जिच्यात गाळ, वाळू, चिकणमाती यांचे योग्य मिश्रण असते) अशी केली जाते.
चिकण मातीमध्ये भरपूर पोषणद्रव्ये असतात. पण तिच्यात पाण्याचा निचरा फार हळू हळू होतो. रेताड मातीत पाणी चटकन झिरपते. पण ती पोषणद्रव्ये किंवा ओलावा धरून ठेवू शकत नाही. मिश्र माती ही सर्वसाधारणपणे योग्य माती समजली जाते. कारण ती पोषणद्रव्ये धरून ठेवू शकते. पाण्याचा निचरासुद्धा चांगला होतो.
माती दाबून मातीचा प्रकार ओळखण्याची पद्धत ;
आपल्या मातीचा प्रकार कोणता आहे हे पाहण्याकरीता, बागेतील एक मूठभर किंचित ओलसर (ओली नाही) माती घ्या व तिला घट्ट दाबाआता मूठ उघडा.
खालील तीनपैकी एक काही तरी घडेल.
- मातीचा आकार तसाच म्हणजे लाडूसारखा राहील आणि तिला हळूच टोचले तर तिचे तुकडे पडतील याचा अर्थ तुमची माती मिश्र जातीची आहे म्हणजे अगदी चांगली आहे.
- ‘मातीचा आकार तसाच राहील, पण हाताला चिकटूनच राहील. म्हणजे तुमची माती चिकण माती आहे.
- ‘मूठ उघडल्या बरोबर माती लगेच सांडून जाईल, याचा अर्थ ती रेताड माती आहे.
‘पाण्याचा निचरा होतो की नाही हे पाहण्याची पद्धती;
आपल्या मातीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो की नाही हे पाहणेही खूप जरुरीचे आहे. जर मुळे खूप ओली राहिली तर काही वनस्पती मरून जाऊ शकतात. म्हणून पाण्याचा निचरा होण्याची मातीची क्षमता पाहण्याकरिता खालील गोष्टी पहा :
- सहा इंच रुंद व एक फुट खोल खड्डा करावा
- खड्डा पाण्याने पूर्ण भरा व पाणी वाहून जाऊ द्या.
- पुन्हा त्यात पाणी भरा.
- पाणी वाहून जाण्याकरिता किती वेळ लागतो याकडे लक्ष असू द्या.
‘जर पाणी वाहून जाण्यासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागत, असेल तर मातीची पाण्याचा निचरा होण्याची क्षमता चांगली नाही असे समजावे.
मातीमध्ये कीटकांच्या अस्तित्वाची परीक्षा ;
विशेषत:माती तपडणा-या जैविक उलाढालीच्या दृष्टीने मातीमध्ये कीटकांचे अस्तित्व हे मातीचे निरोगीपण दाखवणारे महत्त्वाचे निर्देशक आहेत. जर मातीत गांडुळे असतील तर त्याचा अर्थ इतर उपयुक्त असे सूक्ष्मजीवही तिच्यात आहेत. ज्यामुळे माती चांगली राहते व वनस्पतींची वाढही चांगली होते. कीटकांच्या अस्तित्वाची परीक्षा अशा प्रकारे करू शकता.
- माती चांगली तापली आहे व थोडीफार ओलसर आहे. पण गच्च ओली नाही, याची खात्री करून घ्या.
- एक फुट खोल व एक फुट रुंद खड्डा खणून घ्या. पुठ्ठयाच्या तुकडयावर माती बाजूला ठेवा.
- हातांनी माती परत खड्डयात टाकताना नीट तपासून पाहा व गांडुळांची संख्या मोजत राहा.
जर तुम्हाला कमीत कमी 15 गांडुळे आढळली तर तुमची माती चांगल्या स्थितीत आहे असे समजा. त्यापेक्षा कमी असतील तर त्याचा अर्थ तुमच्या मातीमध्ये त्यांची चांगली वाढ होण्या-करिता पुरेसे सेंद्रिय घटक नाहीत. किंवा मातीमध्ये आम्लाचे किंवा अल्काचे प्रमाण जास्त आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.