उन्हाळी भाजीपाला – भाग २
मागील भागात आपण उन्हाळ्यात घेण्यात येणारी विविध प्रकारची पिके आणि लागवड याविषयी माहिती घेतली. या भागात आपण उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या मुख्य भाजीपाला पिकाविषयी माहिती घेऊ.
१ भेंडी व गवार-
उन्हाळ्यात भेंडी व गवार या महत्वाच्या भाज्या घेतल्या जातात. भेंडी आणि गवार यांना मागणी तसेच भाव पण भरपूर मिळतो. त्यामुळे ही पिके शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देतात.
- जमीन व हवामान-
- वाण- पुसा सावनी सिलेक्शन २-२ फुले उत्कर्ण,
- बियांचे प्रकार-
- पूर्व मशागत व लागवड –
जमिनीची मशागत एक नागरटी व एक कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. पेरणीसाठी दोन ओळीत ४५ सेमी अंतर ठेवावे. आणि एका ओळीतील दोन झाडात ३० सेमी अंतर राहील या बेताने बी टोचावी. उन्हाळ्यात सऱ्या पाडून वंरब्याचा पोटाशी बी टोचावे. शेतात ओलवनी करून वाफसा आल्यानंतर बी टोचावे.
- खते व व्यवस्थापन-
पेरणी वेळी ५०-५०-५० किलो हेक्टर नत्र स्फुरद व पलाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणी नंतर १ महिन्याचा कालावधी नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा. पेरणी नंतर हलके पाणी दयावे,त्यानंतर ५ ते ७ दिवसच्या पाण्याचा पाळ्या दया
- काढणी व उत्पादन-
पेरणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. दर ३ ते ४ दिवसांनी फळे काढणीला येतात. उन्हाळी हंगामात ७५ ते ८५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन निघते.
२ वांगी-
- जमीन आणि हवामान-
सर्व प्रकरचा हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पिक घेता येते परंतु सुपीक चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमीन मध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते.कोरडे हवामान वांग्यासाठी योग्य ठरते. ढगाळ वातावरण किंवा पाऊस वांग्याला मानवत नाही.
- लागवडीचा हंगाम –
उन्हाळी हंगामी बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत करतात.
- वाण-
मांजरी गोटा, वैशाली, प्रगती, अरुणा
- बियांचे प्रमाण-
५०० ग्रॅम/हेक्टर सुधारित जातीसाठी
१५० ग्रॅम/हेक्टर संकरित जातीसाठी
- लागवड-
वांग्याचे रोपे गादी वाफ्यावर तयार करतात. गादी वाफे ३*१ मिटर आकाराचे आणि १० ते १५ सेमी उंचीचे करावे. गादीवाफे भोवती पाणी देण्यासाठी सरी ठेवाव्यात. बी पेरणी पासून ४ ते ५ आठवड्यात रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना सुरवातीला झारीने आणि नंतर वाफ्याच्या भोवती असलेल्या वाफ्यांना गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दया. वांगी पिकास तुषार सिंचन/ठिंबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत होते.
काढणी व उत्पादन –
रोप लागवडीनंतर १० ते १२ आठवड्यांनी फळे तयार होतात. फळांची काढणी फळे चकचकित दिसायला लागल्यावर करावी. कोवळी किंवा जुनी फळे काढू नये. ४ ते ५ दिवसाच्या अंतराने १० ते १२ वेळा वांग्याची तोडणी करता येते.
3 कोथिंबीर-
उन्हाळी हंगामात कोथिंबीर उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्यामुळे कोथिंबीर लागवड शेतकऱ्याला चांगला नफा देतो.
जमीन हवामान-
अति पावसाच्या प्रदेश वगळता महाराष्ट्रतील वातावरण वर्ष भर कोथिंबीरसाठी पोषक असते. ३६ अंश वर तापमान गेल्यास कोथिंबीर वाढ कमी होते.
वाण-
६५ टी, ५३६५, एन पी जे, १६ वी १ ही २ आणि डी ९२, डी ९४, जे २१४, के ४५.
लागवडीचा हंगाम-
उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिना कोथिंबीर साठी असतो. लागवडीसाठी ३*२ मीटर आकारचे वाफे फोडून करावी. उन्हाळ्यात पेरणी पूर्वी वाफे भिजवून वाफसा आल्यावर बी पेरावे. बी पेरणी पूर्वी धणे हळुवार फोडून बिया वेगळ्या करा व १२ तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ८ ते १० दिवसात बिया उगवतात. बियाणे हेक्टरी ६० ते ८० किलो लागते.
खत व्यवस्थापन-
कोथिंबीर बी उगवल्यावर १५ ते २० दिवसांचे हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे. तसेच २० ते २५ दिवसांसाठी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारणी केल्यास पिकांची लागवड चांगली होते.
पाणी नियोजन-
कोथिंबीरच्या पिकास नियमित पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या पाळीणे पाणी द्यावे.
काढणी व उत्पादन-
कोथिंबीरला फुले येण्यापूर्वी कोवळी लुसलुशीत १५ ते २० सेमी वाढलेली कोथिंबीरची काढणी करावी. उन्हाळ्यात ६ ते ७ टन प्रती हेक्टरी उत्पन्न मिळेल.