उन्हाळयातील पिके : भाग १

0

मुख्यत: तीन प्रकारचे हंगाम पिके आपल्या महाराष्ट्रात घेतले जातात. उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. उन्हाळी पिक घेणे हे शेतकऱ्यासाठी खूप कष्टाचे असते. कारण उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असते. उष्ण हवा कोरडे हवामान आणि सोसाट्याचा वारा यामुळे जमिनीची ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात कमी होते. मात्र योग्य पिकांची निवड, योग्य जमिनीची निवड योग्य प्रकारची रान बांधणी, कीड नियंत्रण तणांचा बंदोबस्त, बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी मल्चिंग पेपर किंवा पालापाचोळा आणी पिकाला पाणी देण्यास आधुनिक तंत्रज्ञान जसे ठिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन वापरल्यास शेतकरी चांगले उत्पन्न काढू शकतो.

उन्हाळयात उत्पादन कमी असते मात्र भाजीपाल्याची मागणी जास्त असते. भाजीपाला पिकास चांगला बाजारभाव मिळतो. आणि त्यामुळें शेतकऱ्याचा चांगला फायदा होतो.

  • उन्हाळ्यात येणारी तीन प्रकारची पिके-

१ भेंडी, कारली, भोपळा, मेथी, काकडी, कोथींबीर, मीरची, वांगी, दोडकी, गवार टोमॅटो, पोकळा, माठ, राजगिरा इत्यादी पिकांचा उन्हाळी भाजीपाल्यात समावेश होतो.

२ तसेच उन्हाळ्यात कलिंगड व खरबूज ही दोन फळांचे उत्पादन मुख्यतः उन्हाळ्यात घेतले जाते.

३ उन्हाळ्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या तीळ, भुईमुगचा तेलबिया मध्ये समावेश होतो.

 

 

आता उन्हाळ्यात घेण्यात येणारे भाजीपाला बद्दल माहिती घेऊया

  • जमिनीची निवड आणि लागवड-

१ उन्हाळ्यामध्ये पाण्याची काही प्रमाणात कमतरता असते. त्यामुळे उत्तम पाण्याचा निचरा होण्याऱ्या सुपीक जमिनीची निवड करणे गरजेचे असते. ज्या जमिनीत अधिक सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. अशी जमीन उन्हाळी भाजीपाला लागवडीसाठी अतिशय योग्य ठरू शकते.

२ याच बरोबर उन्हाळ्यातील कोरडे हवामान आणि वाहणारे वारे यापासून भाजीपाल्याच्या संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजुंनी पिकांची दाट लागवड करणे गरजचे असते.

३ पाण्याची कमतरता लक्षात ठेवून ठिबक सिंचन, फवारणी तसेच मल्चिंग पेपर यांचा वापर केल्यामुळे जमिनीची ओल टिकवून ठेवण्यास मदत होते.

४ खताचा वापर करताना रासायनिक व सेंद्रिय खताचे योग्य संतुलन साधावे.

५ फुलोऱ्यादरम्यान संजीवकांचा वापर करत रोपवाटिकेपासून ते फळ धारणा होईपर्यंत रोग व कीड संरक्षणासाठी जैविक व रासायनिक औषधांचे नियोजन करावे. विशेषत; फुलोरा ते फळ काढणीच्या काळात एकसारखा पाणी पुरवठा आणि तो सुध्दा सकाळी आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळी करावा.

 

  • पुढील भागात आपण उन्हाळी भाजीपाल्यात मोडणाऱ्या पिकांची माहिती आणि काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊ .

https://krushisamrat.com/high-yielding-crops-at-low-cost/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.