उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन
व्यवस्थापन – १) गोठा
२) आहार चारा व पाण्याचे व्यवस्थापन व लसीकरण
३) आरोग्याची काळजी
उन्हाळ्यात ४५ अंश से. पेक्षा जास्त तापमान, त्याच बरोबर हिरव्या चाऱ्याची कमतरता, त्यामुळे जनावरे आवश्यकते प्रमाणे उत्पादनक्षम राहत नाही. अश्या वेळी जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. अश्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या जनावरांची काळजी आपण त्यांना योग्य प्रमाणात आहार, योग्य वातावरण तसेच आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून करू शकतो. ते आपण या भागात जाणून घेऊ.
जनावरांच्या शरीरातील ऊर्जा शेण, लघवी किंवा घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडते व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते, उन्हाळ्यात मात्र वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांचे शरीराचेही तापमान वाढते व हे तापमान वाढल्याने जनावरे अधिक पाणी पितात व चारा कमी खातात परिणामी दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते.
गोठा व्यवस्थापन –
१) जनावरांना उन्हात उभे न करता उष्माघातापासून वाचविण्यासाठी हवेशीर गोठयात ठेवावे.
२) गोठयाच्या आजूबाजूला झाडे लावावी.
३) गोठयाच्या छताची उंची जास्त असावी.
४) छताच्या पत्र्याला पांढरा रंग द्यावा किंवा उन्हाळ्याच्या वेळी छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होते.
५) गोठयात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावे.
६) जनावरांना जास्तीत – जास्त वेळा थंड पाणी पिण्यास द्यावे.
७) गोठा जास्तीत – जास्त प्रमाणात थंड ठेवण्यासाठी स्प्रिंकलर, फॉगर्सचा वापर करू शकतो.
८) फॉगर्स यामध्ये पाण्याच्या थेंबाचे रुपांतर लहान कणांच्या रुपात होते व ते जनावरांच्या अंगावर चिकटल्याने जनावरांचे शरीर थंड होते !
९) गोठयाच्या भोवती गोणपाट बांधावे जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन आत येईल.
१०) जनावरांच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवावे व त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
सौ. वृषाली खडके
[…] उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन […]
[…] उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन […]